शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

कुजबुज: अजित पवारांचा पुन्हा शपथविधी? NCP पदाधिकाऱ्यांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 7:23 AM

आमदार अपात्रतेप्रकरणी आता लवकर निकाल लागून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या याचिकेबाबत विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढल्याने अजित पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी आता लवकर निकाल लागून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील व अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात पुन्हा रंगू लागली आहे. यापूर्वी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी बॅनर्सही लावले होते. त्यामुळे अजित पवारांचा पुन्हा शपथविधी व्हावा यासाठी त्यांचे पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

एक हजार कोटींची चुरस

स्वातंत्र्यानंतरही मूळच्या आदिवासी गावपाड्यांना आजपर्यंत रस्ते मिळालेले नाहीत. त्यासाठी सतत पाठपुरावा झाला मात्र दुर्दैवाने मुंबई-पुणे महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून शोककळा पसरली. डोंगरवाटेने, भरपावसात पायी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैमध्ये इर्शाळवाडीचे घटनास्थळ गाठले होते. सचिवही त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री व सचिव यांच्या चालण्याच्या या अनुभवामुळे १६ जिल्ह्यांत दुर्गम भागातील गावे, खेडी, पाड्यांना तीन हजार किमीचे रस्ते मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या पाच हजार कोटींच्या खर्चापैकी एक हजार कोटीचा निधी त्वरित मिळविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी राजकारण्यांमध्ये चुरस सुरू आहे.

नार्वेकर साहब तुम्हारा जवाब नही

नवी मुंबईत गणेशाेत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. सर्वत्र चोख व्यवस्था ठेवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी नेमलेले आहेत. यावर आयुक्त  राजेश नार्वेकर हे स्वत: देखरेख ठेवून आहेत. यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील विसर्जन मार्गांवरील सर्वच रस्ते खड्डेमुक्त झाले. नवी  नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही गणेशोत्सवा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यांच्या आवाहनानुसार मुस्लीम बांधवांनी गणेशाेत्सवानंतर ईदचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजेश नार्वेकर आणि मिलिंद भारंबे यांना उद्देशून नवी मुंबईकर साहब तुम्हारा जवाब नही, असे म्हणत आहेत.

मोठ्यांचा नेम नाही भाऊ

राजकारणापलीकडे मैत्री जपणे ही महाराष्ट्राची संस्कृती म्हटली जात असली तरी राजकीय पक्षांमध्ये एकमेकांविरोधात होत असलेली टीका आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप पाहता राजकारणाची पातळी घसरल्याचे सदैव पाहायला मिळते. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावरून मनसेने थेट सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. परंतु, त्याच चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर डोंबिवली शहरात लागल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचे अलीकडेच दर्शन घेतले. एकूणच ‘मोठ्यांचा काही नेम नाही भावा’ अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस