शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अजित पवारांचे पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 3:46 PM

अजित पवार हे वेळेचं बंधन पाळणारे नेते आहेत. अनेक ठिकाणी ते वेळेच्या पूर्वीच हजर होतात. मात्र दादांनी पुणे दौरा रद्द केल्याने अनेक चर्चा होत आहे.

मुंबई - राज्याच्या राजकारणात पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाच्या सातत्याने वावड्या उठत आहेत. नागपूरात रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर अजित पवार रात्री उशिरा नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात श्रीसेवकांची विचारपूस करण्यासाठी पोहचले. त्याठिकाणाहून अजितदादा पुण्याला न जाता थेट मुंबईतील त्यांच्या देवगिरी बंगल्यावर गेले. 

पुण्यात आज अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम होते. परंतु पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यातच दुसरीकडे भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. अमित शाह २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते अचानक दिल्लीला का गेले असाही प्रश्न विचारला जात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे दिल्ली दौऱ्यावर गेले  आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची जोरदार चर्चा, राऊतांचा दावा आणि प्रकाश आंबेडकरांच्या भविष्यावरून चर्चेला उधाण

अजित पवारांचा पुणे दौरा कसा होता?सकाळी ९.३० वाजता - वडकी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटनसकाळी ९.४५ वाजता - दिवे येथून मोटार सायकल रॅलीसकाळी १०.१५ वाजता - मौजे वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्धाटनसकाळी १०.४५ वाजता - मौजे भिवरी, जिल्हा परिषद पुणे साठवण बंधारा भूमिपूजनपुणे - सासवड रस्ता ते पुणे सातारा हायवे जोड रस्त्याचे पूजनहॉटेल आमराई ६९ रिसोर्ट उद्धाटनहॉटेल सुभेदार वाडा उद्धाटनसकाळी ११.२० वाजता - वाघिरे महाविद्यालयात राखीव वेळसकाळी ११.३० वाजता - शेतकरी आणि युवक मेळावा, सासवड

अजित पवार हे वेळेचं बंधन पाळणारे नेते आहेत. अनेक ठिकाणी ते वेळेच्या पूर्वीच हजर होतात. मात्र दादांनी पुणे दौरा रद्द केल्याने अनेक चर्चा होत आहे. दौरा रद्द होणे हे नवे नसले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांच्या मनात नक्की काय चाललंय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मागच्यावेळीही अजित पवार यांचा पुणे दौरा रद्द झाला, ते नॉट रिचेबल झाले तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव ते बाहेर आले नाहीत असं सांगण्यात आले. मात्र आज नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

कुटुंबाला केले जातेय टार्गेटराऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मुखपत्रात रविवारी असे लिहिले की, उद्धव ठाकरेंसोबत मी शरद पवार यांना भेटलो. तेव्हा पवार हे ठाकरेंना म्हणाले की, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही. पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण पक्ष म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही असं विधान शरद पवार यांनी केले होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपा