'मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठिशी घालणार नाही', अजित पवारांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:24 AM2024-02-29T11:24:34+5:302024-02-29T11:25:26+5:30

Maharshtra Assembly Budget Seasion 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून, त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास सुरु आहे

Ajit Pawar's statement in the Legislative Assembly on the matter of using fake signature, stamp of the Chief Minister is serious, will not support anyone. | 'मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठिशी घालणार नाही', अजित पवारांची विधानसभेत घोषणा

'मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठिशी घालणार नाही', अजित पवारांची विधानसभेत घोषणा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून, त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

Web Title: Ajit Pawar's statement in the Legislative Assembly on the matter of using fake signature, stamp of the Chief Minister is serious, will not support anyone.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.