निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता, अजित पवार यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 07:55 IST2025-01-22T07:55:01+5:302025-01-22T07:55:45+5:30
Ajit Pawar News: मार्चमधील यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील. निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता. आता पाच वर्षे आर्थिक शिस्त पाळायची आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता, अजित पवार यांचं विधान
मुंबई - मार्चमधील यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील. निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता. आता पाच वर्षे आर्थिक शिस्त पाळायची आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही याबाबत दुमत नाही, असेही ते म्हणाले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह विविध योजना सरकारने जाहीर केल्या होत्या. त्यामुळे एक लाख कोटींच्यावर राज्याच्या तिजोरीवर भार आला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
मीडिया ट्रायल नको
२००९ मध्ये माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला.
राज्य निर्मितीपासून पगारासहीत जलसंपदा विभागात ४३ हजार कोटी खर्च झाला, मग ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा?
माध्यमांनी मिडिया ट्रायलचा मार्ग न निवडता सत्य काय आहे त्याला महत्त्व द्यावे, असेही अजित पवार म्हणाले.