उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:01 PM2023-01-06T22:01:42+5:302023-01-06T22:02:43+5:30

Urfi javed & Chitra wagh: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यार रंगलेल्या या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या प्रतिक्रियेचीही आता चर्चा होत आहे.

Ajit Pawar's tough reaction to the controversy between Urfi Javed and Chitra Wagh, said... | उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले...

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यार रंगलेल्या या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या प्रतिक्रियेचीही आता चर्चा होत आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादाबाबत चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, तुम्ही बघा हे सर्व महिला महिलांचंच चाललेलं आहे. आम्ही कुणी त्याच्यात भाग घेतला आहे का? आम्ही तर महिलांना संधी देतोय. परंतु संधी देत असताना त्या संधीचं सोनं करायचं की राख करायची, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

दरम्यान, उर्फी जावेद हिच्यावर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी तुफान टीका केली होती. तशातच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवल्याची माहिती दिली. चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केला, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार ही नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर म्हणाल्या. यावर आता चित्रा वाघ यांनीही उत्तर दिले आहे. "स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर..!" अशी निर्भिड प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. 

Web Title: Ajit Pawar's tough reaction to the controversy between Urfi Javed and Chitra Wagh, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.