शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
ZIM vs IND Live : 'शतकवीर' अभिषेकला ऋतुराजची चांगली साथ! रिंकूचा फिनिशिंग टच; झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर
3
"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
4
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
5
ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस
6
सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
7
८ सिक्स! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती शतक; अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला
8
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
9
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, २ वर्षांपूर्वी लग्न; कुलगाममध्ये शहीद प्रदीप यांची पत्नी गर्भवती
10
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
11
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
12
हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS
13
"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
14
डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
15
"ज्याच्या घरातील लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की", 'धर्मवीर २'चा जबरदस्त टीझर
16
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
17
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
18
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
19
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
20
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी

अकोला ठरले ’जगातील सर्वाधिक उष्ण शहर’; पारा ४४.२ अंशांव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2022 8:52 PM

Akola Mercury 44.2 degrees : कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले.

अकोला : गत काही दिवसांपासून सुरु असलेली उष्णतेची लाट कायमच असून, सूर्य प्रखरतेने तळपत असल्याने मंगळवारी (दि. ५ एप्रिल) जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात करण्यात आली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. नायझर देशातील बिर्नी एन कोन्नी (४४ अंश सेल्सियस) दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. टॉप पाच शहरांमध्ये पाकिस्तानमधील नवाबशाह व नायझर देशातील एनगुल्ग्मी व टिलाबेरी या शहरांचा समावेश आहे.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू असलेली उष्णतेची लाट एप्रिल महिन्यात आणखीन तीव्र झाली आहे. गत आठवडाभरापासून अकोला शहराचे तापमान ४३ अंशांच्या वरच राहिले आहे. रविवारी पहिल्यांदाच पारा ४४ अंशांवर गेला. पुढील दोन दिवसांत यामध्ये वाढ होऊन मंगळवारी ४४.२ अंश सेल्सियश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव म्हणून नागरिक रूमाल, स्कार्फ, दुपट्ट्यांचा वापर करत आहेत. अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तप्त झळा असह्य होत असल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानTemperatureतापमान