- ऑनलाइन लोकमत
शेतजमीन मात्र भेगाळली
अकोला, दि. 30 - पश्चिम विदर्भात (व-हाड) पावसाने यावर्षी सरासरी गाठली आहे.मागील चार वर्षांनंतर प्रथमच जून ते ऑगस्ट महिन्यात ११० टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत ६०७.३ पाऊस हवा होता तो ६७०.७ मि.मी पाऊस झाला आहे. मागील २५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतजमीन भेगाळली असून, वातावरण दमटपणा वाढला आहे.
जून ते ऑगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ६०७.३ मि.मी. पाऊस अपेक्षित होता; परंतु ३० ऑगस्टपर्यंत यावर्षी ६७०.७ मि.मी. म्हणजेच ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ११८ टक्के पाऊस अकोला जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यात ३० ऑगस्टपर्यंत ५३४.४ मि.मी. पाऊस अपेक्षित होता, तो यावर्षी ५५८.५ मि.मी. म्हणजेच ११८ टक्के झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५१३.७ मि.मी. पाऊस हवा होता तो ५५७.० मि.मी. म्हणजेच १०९ टक्के झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ६२५.० मि.मी. पावसाची गरज होती प्रत्यक्षात ७१५.९. म्हणजेच ११५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ६३५.७ मि.मी. पाऊस अपेक्षित होेता; परंतु ७३३.५ मि.मी. ११५ टक्के पाऊस होऊन सरासरी ओलांडली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ७१९.१ मि.मी.पाऊस अपेक्षित होेता. यावर्षी ७०७.७ मि.मी. म्हणजेच ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
- यावर्षी विभागात ११० टक्के पाऊस झाला असून, पिके उत्तम आहेत. परंतु मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. आता पावसाची गरज आहे.
- एस.आर. सरदार, विभागीय सहसंचालक, अमरावती.