मुंबई : बाबरी मशिदीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून लष्कर-ए-तोयबाने गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला केल्याची माहिती डेव्हिड हेडलीने गुरुवारी विशेष न्यायालयाला दिली. ‘भारतीयांनी मशिदीवर हल्ला केला म्हणून त्यांच्या मंदिरावर हल्ला करणे न्यायपूर्ण आहे,’ असे मुझम्मिलने म्हटल्याची माहिती हेडलीने उघड केली. तसेच भारतावरील हल्ल्यांसाठी आयएसआय आणि एलईटी आर्थिक रसद पुरवत असल्याचेही हेडलीने सांगितले. मुंबईत हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांना मुंबईत येण्यासाठी हेडलीने कफ परेड, वरळी आणि गेट वे आॅफ इंडियाची रेकी केली होती, असेही त्याने स्पष्ट केले.मुंबईवरील हल्ल्यांसाठी योग्य ठिकाणांची रेकी करण्यासाठी एलईटी किंवा आयएसआयकडून आर्थिक मदत मिळाल्याचे नाकारणाऱ्या हेडलीने गुरुवारी भारतामध्ये घातपात घडवण्यासाठी आयएसआय आणि एलईटीकडून आर्थिक मदत मिळाल्याचे मान्य केले. ‘डिसेंबर २००६मध्ये भारतात येण्यापूर्वी आयएसआयचे निवृत्त मेजर इक्बाल यांनी मला २५ हजार डॉलर दिले. इक्बाल मला नेहमी हफ्त्याने पैसे देत असत. त्यांनी एक किंवा दोन वेळा भारतीय चलनही दिले. एलईटीचा साजिद मीर याने एप्रिल आणि जून २००८मध्ये पाकिस्तानी चलनातील ४० हजार दिले. आयएसआयचे अब्दुल रहमान पाशा यांनीही एकदा मला ८० हजार रुपये दिले होते. डॉ. तहव्वूर राणा हेदेखील मला मधूनअधून पैसे पाठवत असत,’ अशी साक्ष हेडलीने न्यायालयापुढे नोंदवली. मुंबईत आल्यावर ओळख लपवण्यासाठी ‘मेसर्स इमिग्रंट लॉ सेंटर’ उघडण्याची कल्पना माझी होती. मी याविषयी साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सहमती दर्शवली. मेजर इक्बाल यांनी मला भारतात इंटेलिजन्स काम करण्यास सांगितले आहे, अशी माहिती मी डॉ. राणा यांना दिली. राणा तत्काळ या कामासाठी तयार झाले, असे हेडलीने न्या. जी.ए. सानप यांना सांगितले.अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या राणाने २६/११च्या हल्ल्यापूर्वी मुंबईला भेट दिली होती. त्या वेळी हेडलीने त्याच्या जिवाला धोका निर्माण होईल, या भीतीने राणाला लवकर भारत सोडण्याची सूचना केली होती. त्याशिवाय राणाने शिकागो येथील ‘मेसर्स इमिग्रंट लॉ सेंटर’चा भागीदार रेमंड सँडर्स याला भारतात नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आरबीआयला पत्र लिहिण्यास सांगितले होते. मात्र आरबीआयने त्यास नकार दिला, असे त्याने सांगितले.न्यायालयातही चकमक बनावट असल्याचे उघड - मुन्ना साहीलसीबीआय आणि न्यायालयाचे खंडपीठ यांच्या चौकशीत इशरतला खोट्या चकमकीत मारली गेल्याचे उघड झाल्याकडे इशरतचे जवळचे नातेवाईक मुन्ना साहिल यांनी लक्ष वेधले. एसआयटी आणि सीबीआयने ती निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला आहे. हेडलीच्या आरोपांना आमचे वकील न्यायालयात उत्तर देतील. मात्र जो हेडली आता इशरतवर आरोप करीत आहे तो स्वत: एक दहशतवादी आहे. त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, असे ते म्हणाले.‘इशरतच्या नावाने राजकारण केले जात आहे. तिच्याकडे मुस्लीम म्हणून बघू नका,’ अशी विनंती इशरतच्या मृत्यूनंतर न्यायालयीन लढ्यात तिच्या कुटुंबाची साथ देणारे माजी नगरसेवक अब्दुल रौफ लाला यांनी केली. ‘इशरतची हत्या करण्यात आल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट केले.विश्वासार्हता नसलेल्या हेडलीच्या आरोपांवर विश्वास ठेवू नका,’ असेही ते म्हणाले. ‘आमचा न्याय व्यवस्थेवर ठाम विश्वास आहे. ज्यांचा हेडलीवर विश्वास असेल त्यांना एकच सवाल आहे की जर ती दहशतवादी होती तर तिची हत्या का केली? हेडलीच्या वक्तव्याने न्यायालयाच्या सुनावणीवर प्रभाव पडणार नाही. त्याने काही वर्षांपूर्वी असाच आरोप केला होता. तेव्हाच तपास का केला नाही? हेडली हा डबल एंजट आहे. तो कदाचित पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांवरही बेलगाम आरोप करू शकतो. मग त्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार का,’ असा प्रश्न त्यांनी केला.
बाबरीच्या बदल्यासाठीच अक्षरधाम हल्ला
By admin | Published: February 12, 2016 2:33 AM