वाडा : तालुक्यातील आलमान या रस्त्याची मोठी दूरवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाडा आगाराने या मार्गावरील एसटीच्या फेऱ्या बंद केल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व नागरीकांची गैरसोय झाली असून त्यांचे नुकसान होईल.हा रस्ता जिल्हा परिषद बांधकामच्या अखत्यारीत येत असून तो उखडला गेला आहे. वाड्यापासून ८ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या गावात येण्याजाण्यासाठी एसटी हाच पर्याय होता. इतकी वर्ष सुरु असलेली एसटीची सेवा खराब रस्त्यामुळे अचानक बंद झाली आहे. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून लहान वाहने, कार, जीप, रिक्षा आदी रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना ८ कि.मी. अंतराचा प्रवास पायी करावा लागतो आहे. (वार्ताहर)
आलमान बस बंद : विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Published: October 03, 2016 3:27 AM