अहमदनगर : पुणे येथील परफ्युम कंपनीतील टाकाऊ मिथेनॉलयुक्त रसायनापासून देशी दारू तयार करण्याचा उद्योग याकूब शेख, सोनू दुग्गल, अजित ऊर्फ नन्ना सेवाणी व त्यांचे साथीदार करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ तसेच अमित मोतीयानी याच्या माध्यमातून हे रसायन नगर येथे मागविण्यात आले होते़ पुणे येथील मिथेनॉलयुक्त रसायनापासून बनविण्यात आलेल्या देशी दारूमुळेच पांगरमल येथील नऊ, तर तरवडी येथील एकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत सोळा आरोपींना अटक केली आहे़ अमित मोतीयानी व नवनाथ धाडगे यांच्या पोलीस कोठडीत शनिवारी न्यायालयाने २१ मार्चपर्यंत वाढ केली. जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये बनावट दारू तयार करणारे जितू गंभीर, जाकीर शेख, सोनू दुग्गल, अजित सेवाणी, भरत जोशी व त्यांचे साथीदार धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील दादा वाणी याच्याकडून अल्कोहोल आणत होते़ वाणी याला धुळे पोलिसांनी पकडल्याने त्याच्याकडून होणारा अल्कोहोल पुरवठा खंडित झाला़ त्यामुळे मोतीयानी याच्या माध्यमातून पुणे येथील रसायनाच्या व्यावसायिकाकडून दुग्गल आणि सेवाणी यांनी रसायन मागविले होते़ बनावट देशीदारू पांगरमल येथील पार्टीसाठी जाकीर शेख याच्या माध्यमातून भीमराज आव्हाड याला देण्यात आली होती़ (प्रतिनिधी)पार्टीसाठी दारुमोतीयानी याच्या माध्यमातून पुणे येथील दुग्गल आणि सेवाणी यांनी रसायन मागविले होते़ बनावट देशीदारू पांगरमल येथील पार्टीसाठी जाकीर शेख याच्या माध्यमातून भीमराज आव्हाड याला देण्यात आली होती़
टाकाऊ रसायनातून बनविली दारू
By admin | Published: March 19, 2017 1:14 AM