शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

स्कूटरच्या डिक्कीतून दारूची वाहतूक

By admin | Published: July 12, 2017 3:33 AM

दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. तर डोंबिवली आणि ठाणे विभागानेही केलेल्या कारवाईत गावठी दारुसह चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन स्कूटर, देशी विदेशी मद्यासह एक लाख एक हजार ९०३ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.एका स्कूटरमधून बदलापूरात गावठी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाणे भरारी-१ चे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख, अनिल गायकवाड, हवालदार केतन वझे, राजू राठोड आणि कुणाल तडवी आदींच्या पथकाने १० जुलै रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बदलापूर गावातील हॉटेल राजेंद्र जवळ एका स्कूटरसह महेशला पकडले. या स्कूटरच्या डिक्कीतून देशी आणि विदेशी बनावटीचे मद्य या पथकाने जप्त केले. याच स्कूटरजवळ दुसरीही स्कूटर उभी होती. तीही त्याचीच असल्याचे समजल्यानंतर या पथकाने तिच्याही डिक्कीत तपासणी केली. त्यावेळी दुसऱ्याही स्कूटरमध्ये मद्याचा साठा मिळाला. त्याच्याकडून दोन्ही स्कूटरमधील १२.६० लीटर विदेशी, १३.७७ लीटर देशी मद्यासह दोन स्कूटर असा ८८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. दरम्यान, ठाण्याच्या ‘डी’ विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावर, दुय्यम निरीक्षक पी. पी. घुले यांच्या पथकानेही मंगळवारी दुपारी (११ जुलै रोजी) खर्डी गावातील दिवा शीळ रस्त्यावरील महादू निघूकर यांच्या घराशेजारी दत्ता निघूकर यांच्याकडून देशी आणि विदेशी मद्यासह सहा हजार ६८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.>मानपाडा येथेही कारवाईडोंबिवली विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे यांच्या पथकाने सोमवारी रात्री मानपाडा येथील हॉटेल राधाकृष्ण आणि कोळसेवाडीतील हॉटेल सेव्हन स्टार येथे छापा टाकून बेकायदेशीर विक्री होणारी २६ ली. बियर जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. याच पथकाने मंगळवारी दुपारी डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगरातील रोहिदासनगर येथे अवैधपणे दारु विकणाऱ्याला अटक केली.