ऑनलाइन लोकमतरिसोड, दि. 25 - दारूच्या नशेत तर्रर्र पतीने घरातच शेकोटी पेटविल्याने घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. पीडित पत्नीने दिलेल्या अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मद्यपी इसमाविरूद्ध रविवार २५ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद केली आहे. यासंदर्भात रिसोड पोलिसांत अंजू पवार (रा. पळसखेडा) नामक महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की तिचा पती भागवत पवार याने २४ डिसेंबरच्या सायंकाळी दारूच्या नशेत घरातच शेकोटी पेटवली. प्रमाणाच्या बाहेर जाळ झाल्याने घरात असलेली दुचाकी, दूरचित्रवाणी संच यासह इतर संसारोपयोगी साहित्य यामुळे जळून खाक झाले. अशा तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी भागवत पवारविरुद्ध भादंविचे कलम २८० अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी पुढील तपास करीत आहेत.
मद्यपी पतीने घरातच पेटवली शेकोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 9:53 PM