शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

आलिया म्हणाली... मीही मराठी मुलगी आहे! रणबीर म्हणाला... ती अमिताभ बच्चन आहे!

By admin | Published: April 13, 2017 2:01 AM

अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्ट यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्या दोघांची मुलाखत घेतली.

- अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्ट यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्या दोघांची मुलाखत घेतली. आजच्या या पुरस्कारांविषयी एक महाराष्ट्रीयन या नात्याने तुम्हाला काय वाटते? आलिया : लोकमतने महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार दिल्याने मला खूप छान वाटते आहे. महाराष्ट्रीयन असल्याचा मला अतिशय अभिमान आहे, कारण मी एक मुंबईकर आणि महाराष्ट्रीयन आहे. बालपणी घरी माझी एक मैत्रीण यायची. ती पक्की महाराष्ट्रीयन होती. ती आली की, ‘ये मराठी मुलगी आ गयी’ असे मी म्हणायचे. आज मीही अभिमानाने सांगते की मीही मराठी मुलगी आहे.

रणबीर, विविध कार्यक्रमांमध्ये तू आलियाबद्दल असलेला आदर, प्रेम व्यक्त केले आहेस. तिची घोडदौड पाहून काय वाटते? तुला तिची भावलेली भूमिका कुठली?रणबीर : खरेतर, मी आणि आलिया संजय लीला भन्साळी यांच्या ‘बालिका वधू’ चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होतो. आम्ही एक फोटोशूटही केले होते. मात्र काही गोष्टींमुळे ते झाले नाही. मी आलियाचा मोठा फॅन आहे. तिने अभिनयाची सुरुवात करण्याच्या आधीपासून तिच्यातील अभिनयाबाबत मला माहीत होतं. सुरुवातीपासूनच तिच्यात स्पार्क दिसत होता. तिचे ‘हायवे’तील काम खूप छान होते. मी तो पाहून त्या वेळी माझ्या मित्रांना सांगितले की, ती अमिताभ बच्चन आहे. एवढ्या कमी वयात इतकं चांगलं काम करणं सोपं नाही.

रणबीरने तुझे कौतुक केले आहे. तुझं काय म्हणणं आहे रणबीरविषयी?आलिया : मी रणबीरला पहिल्यांदा भेटले त्या वेळी मी ११ वर्षांची होती. त्या वेळी रणबीर संजय लीला भन्साळींना असिस्ट करत होता. मला त्या वेळी रणबीरसह फोटोशूट करायचे होते. मला रणबीरच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवायचं होतं. लाजत असल्यामुळे मला ते जमत नव्हतं. पण रणबीरनं मला खूप सपोर्ट केला. माझ्या कारकिर्दीमध्ये रणबीरने दिलेल्या प्रोत्साहनाचा खूप मोलाचा वाटा आहे. ‘हायवे’ पाहून रणबीरने मला फोनही केला होता. माझ्या भूमिकेचं त्यानं त्या वेळी कौतुक केलं होतं.

रणबीरने साकारलेली तुझी सगळ्यात आवडती भूमिका कोणती?आलिया : रणबीरची सर्वोत्तम भूमिका अजून यायची आहे. मात्र राजू हिराणींच्या सिनेमात ती कसर भरून निघेल असं मला वाटतं. हिराणींच्या सिनेमातील रणबीरची भूमिका सर्वोत्तम असेल असं मला वाटतं. त्याशिवाय ‘बर्फी’ आणि ‘रॉकस्टार’ सिनेमातील त्याच्या भूमिका चांगल्या होत्या.

तुम्ही दोघंही नव्या जनरेशनचं प्रतिनिधित्व करता. तुमचे पालक आणि तुम्ही यांच्या काळातील सिनेमात झालेला फरक तुम्हाला जाणवतो का?रणबीर : माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की सिनेमा जसा बनवला जात होता आजही तसा बनवला जातो. सिनेमातील पात्रं पूर्वीच्या काळात होती तशीच असतात. फक्त सिनेमाच्या कथेचा गाभा काहीसा वेगळा असतो. प्रत्येक सिनेमातून काही ना काही संदेश जात असतो. त्या कथेचं काहीतरी वेगळं महत्त्व असतं. मात्र गेल्या काही दिवसांत सिनेमागृहाकडे रसिकांनी पाठ फिरवल्याचं दु:ख आहे. सिनेमाची कथा अशी दमदार असावी की सिनेमागृहापासून दूर गेलेला रसिक पुन्हा एकदा परत येईल.

सध्या तू संजय दत्तच्या जीवनावरील सिनेमात काम करतो आहेस. आलिया कोणत्या अभिनेत्रीवरील बायोपिकमध्ये काम करताना तुला बघायला आवडेल?रणबीर : माधुरी दीक्षित, मीना कुमारी, मधुबाला, वहिदा रेहमान, झीनत अमान, परवीन बाबी...आणि जितेंद्रजी यांच्या जीवनावर सिनेमा बनला तर त्यांची कोणती गोष्ट तुला कॉपी करायला आवडेल?रणबीर : जितेंद्रजी यांची स्टाइल फॉलो करायला मला आवडेल. त्यांची कपड्यांची स्टाइल म्हणजेच पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट असं सगळं मला कॉपी करायला आवडेल. शिवाय त्यांच्या डान्सिंग स्टाइलचेही क्या कहने. या वयातही ते अगदी तरुणासारखे वाटतात.

आज या व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित आहेत. आपण सगळे मुंबईत राहतो. मुंबईसंबंधित कोणती गोष्ट तुम्हाला त्यांना सुचवावी असं वाटतं का?आलिया : मुंबई माझी जान आहे. मुंबईवर माझं जिवापाड प्रेम आहे. मुंबईविषयी कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे मला काहीही सुचवायचंही नाही. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबई सगळ्यात बेस्ट आहे.रणबीर : मलाही काही सुचवायचं नाही. मुख्यमंत्री चांगलेच काम करताहेत. बोलणं सोपं असतं, पण करणं खूप कठीण आहे. त्यामुळे जे ते करताहेत त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत.

रणबीर, आलियाशी रॅपिड राउंडआपण रॅपिड फायर राउंड खेळू या. मी काही मंत्रिमंडळातील खाती वाचून दाखवतो. त्यातील कोणतं खातं बॉलीवूडच्या कोणत्या कलाकाराला मिळावं असं वाटतं ते सांगा.. संरक्षणमंत्रीआलिया - अक्षय कुमाररणबीर - टायगर श्रॉफहवाई वाहतूकमंत्रीरणबीर - या खात्याचा मंत्री मला स्वत:ला बनायला आवडेल. आलिया - मीसुद्धा या खात्यासाठी रणबीरचंच नाव सुचवेन.रेल्वेमंत्रीरणबीर - शाहरूख खानआलिया - शाहरूख खानअर्थमंत्रीरणबीर - अमिताभ बच्चनआलिया - कौन बनेगा करोडपतीमुळे माझं उत्तरसुद्धा अमिताभ बच्चन.आरोग्यमंत्रीआलिया - आजही अनिल कपूर झक्कास दिसतात. त्यामुळे हे खातं मला अनिल कपूर यांना द्यायला आवडेल.रणबीर - अनिल कपूरमहिला आणि बालविकास मंत्रीरणबीर - कंगना राणौतआलिया - कंगना राणौतगृहमंत्रीरणबीर - हृतिक रोशनआलिया - हृतिक रोशनरणबीर पहाटे तीन वाजता कामाला लागतो : राजकुमार हिराणी आपण संजय दत्त आणि आमीरसह काम केलं आहे. मात्र रणबीरसह काम करण्याचा अनुभव कसा आहे?रणबीर साकारत असलेली भूमिका ही २0 वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीची आहे. त्यासाठी त्याचे विविध गेटअप आहेत. याची तयारी करण्यासाठी रणबीरला पहाटे तीन वाजता उठावे लागते. मेकअपवर जवळपास पाच तास जातात. त्यानंतर १२ तास तो काम करतो. त्यानं कामासाठी उशीर केलाय, असं मला कधीच जाणवलं नाही. तो शूटवर कधीच उशिरा पोहचत नाही किंवा बहाणेही करीत केले नाही. त्याच्यासोबत काम करताना मजा येतेय.आमीरपेक्षा रणबीर कसा वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं ?खरं सांगू, आमीर खान उंचीनं रणबीरपेक्षा किंचित मोठा आहे. बाकी काहीही फरक आहे असं मला तरी वाटत नाही.आलिया कोणत्याही भूमिकेत फिट ठरेलआशुतोष, मला सांगा की आलियाला एखाद्या सिनेमात घ्यायचं असेल तर कोणत्या भूमिकेसाठी आपण तिचा विचार कराल ?आलिया आता करियरमध्ये वेगळ्या उंचीवर पोहचली आहे. कमी वेळात तिनं खूप नाव कमावलं आहे. आज प्रत्येक दिग्दर्शक तिच्या नावाची चर्चा नक्कीच करतो. त्याच्याकडे एखाद्या सिनेमाची स्क्रीप्ट आली की त्यातील भूमिका आलिया कशी साकारेल अशी चर्चा नक्कीच होते. त्यामुळे तिच्यासाठी कोणती भूमिका फिट असेल सांगणं कठीण आहे. जर दिग्दर्शकाकडे तीन स्क्रीप्ट असतील आणि त्या तिन्ही सिनेमांतील भूमिकांमध्ये आलिया फिट बसते तर माझ्या मते आलियाचं हे खूप मोठं यश आहे, असे गोवारीकर म्हणाले.