- जमीर काझी मुंबई : अलिबाग येथे गोळीबारचा सराव करताना गोळी लागून जखमी झालेल्या तिघा महिलांसह चौघा पोलिसांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. एका महिला पोलिसासह दोघांवर मंगळवारी शस्त्रक्रिया करुन शरीरातील छर्रे काढण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून शस्त्र हाताळणी उजळणीविना परस्पर गोळीबार सरावासाठी परस्परपाठविल्या प्रकरणाची सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर संबंधित दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी स्पष्ट केले.आलिबाग येथील पुरहूरपाडा येथे गोळीबाराचा सराव करीत असताना सोमवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल सर्वश्री स्वप्नाली आमटे(२३, रा. घाटकोपर) व रवींद्र मदने (४४, रा. खांदा कॉलनी, पनवेल), नीलम थोरवे (वय २५, रा. कर्जत), सुरेखा बावधने (२३, रा. नायगाव, दादर) गोळी लागून गंभीर जखमी झाले. शस्त्र हाताळणी उजळणी न घेता त्यांना गोळीबार करण्यासाठी पाठविण्यात आले होते.‘लोकमत’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती.स्वप्नाली आमटे ही ‘७.६२ एसएलआर’ रायफलमधून फायरिंग करताना झालेल्या चुकीमुळे गोळी उडून तिच्यासह बाजूचे तिघे पोलीसही जखमी झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.या सर्वांवर नवी मुंबईतील पनवेल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गेल्या ३० जानेवारी ते ३१ मार्चपर्यत मुंबई पोलीस दलातील ४५ वर्षांखालील सर्व अंमलदारांना शस्त्र हाताळणी उजळणी व गोळीबारसराव व्हावा, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजिले आहे. सर्वांना टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करावयाचे असून त्यामध्ये पहिल्या दिवशी पोलिसांना शस्त्र हाताळणीबाबत उजळणी द्यावी, त्यानंतर दुसºयादिवशी त्यांना प्रत्यक्ष गोळीबाराच्या सरावासाठी पाठवावे, असे वरिष्ठांचे आदेश आहेत. मात्र सोमवारी नायगाव मुख्यालयातील निरीक्षक खंदारे यांनी त्यांना शस्त्र हाताळणी प्रशिक्षणााशिवाय थेट गोळीबार सरावासाठी पाठविले होते.पोलिसांमध्ये तीव्र नाराजीघाटकोपर मुख्यालयातसरावासाठी मैदान असताना काहीजणांनाआलिबागला पाठविण्यात येत असल्याबाबत पोलिसांमध्ये नाराजीआहे. कारण पोलिसांना पहाटे साडेपाच वाजता चार मुख्यालयापैकी एकाठिकाणी हजर रहावे लागत असल्याने भल्या पहाटे ते घराबाहेर पडतात.त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास रायफल व काडतुसे घेवून पोलीसव्हॅनमधून आलिबागला पाठविले जाते. सुमारे अडीच तासांच्या खडतरप्रवासानंतर भर उन्हात त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याठिकाणी पुरेसेस्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध नाही.शिस्तीमुळे याबाबत तक्रार करु शकत नसल्याने त्यांना मारुन मुटकूनसराव करावा लागतो. ‘एलए’च्या अप्पर आयुक्त अस्वती दोरजेयांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी घाटकोपर येथे फायरिंगबाबतपरिसरातील नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने आलिबागला पाठविलेजाते. प्रवास व आलिबाग येथील गैरसुविधेबाबत आपल्याकडे कोणतीहीतक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर अहवाल मागविलाही घटना गंभीर असून याबाबत सशस्त्र विभागाच्या (एलए) अप्पर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यानंतर दुर्घटनेला जबाबदार असणाºयांवर योग्य ती कारवाई केली जाईल.- अर्चना त्यागी,सहआयुक्त, प्रशासन
तिघीही महिला खेळाडूदुर्घटनेत जखमी झालेल्या तिन्ही महिला पोलीस या खेळाडू असून नायगाव मुख्यालयात आहेत. आलिबागला पाठविण्यासाठी पुरेसे पोलीस न आल्याने तेथील निरीक्षक खंदारे यांनी त्यांना शस्त्र हाताळणी उजळणीविना थेट गोळीबार सरावासाठी पाठववले. प्राथमिक माहितीनसताना त्यांना पाठवण्यात आले. वरिष्ठ अधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे पोलीसाच्ं ा े लक्ष आहे.