नागपूर : दहा वर्षापूर्वी थेट न्यायालयाच्या कक्षात घडलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कुख्यात गुंड अक्कू यादव हत्याकांड खटल्यातील सर्व 18 आरोपींची सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटका केली.
सरकार पक्षानुसार 13 ऑगस्ट 2क्क्4 रोजी दुपारी 2.3क् वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका:यांच्या न्यायालय क्रमांक 7 मध्ये भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव (32) या कुख्यात गुंडाचा संतप्त जमावाने डोळ्यात मिरची पावडर टाकून, चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. तसेच खून केल्यानंतर जमावाने अक्कूचे घरही जाळून टाकले होते.
या खटल्यात एकूण 21 आरोपी होते. त्यापैकी तीन आरोपींचे खटला सुरू असताना निधन झाले. एकनाथ दुर्योधन चव्हाण (42), सुमेध सुरेश करवाडे (35), दिलीप महादेव शेंडे (42), पंकज सुधाकर भगत (36), सविता जितेंद्र वंजारी (36), भागिरथा हरिचंद्र अडकिणो (6क्), लीलाबाई रघुनाथ सांगोळे (55), नितेश सीताराम मेश्रम (31), मनीष शंकरराव लाबडे (33), अॅड. विलास श्रीराम भांडे (44), ईश्वर हरिचंद्र अडकिणो (4क्), पिंकी अजय शंभरकर (33), नीलेश सुखदेव हुमणो (32), रितेश सुखदेव हुमणो (35), राजेश चंद्रभान घोंगडे (4क्), उषा मधुकर नारायणो (36), विजय मयूर शिंदे (35) आणि राजेश दत्तू उरकुडे, अशी निदरेष सुटका झालेल्यांची नावे आहेत. तर अजय सुदाम मोहोड, अंजना किसन बोरकर आणि देवांगना सुखदेव हुमणो, अशी निधन झालेल्या आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)
च्अक्कू याच्याविरुद्ध बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली आदी 26 गंभीर गुन्हे पोलिसांत दाखल होते. बलात्कार आणि छेडछाडीची अनेक प्रकरणो त्याच्या दहशतीमुळे पोलिसांर्पयत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून मोहल्ल्यात यायचा आणि गुंडागिरी करायचा. तक्रारीनंतरही पोलीस त्याला अटक करीत नव्हते.
च्अॅड. विलास भांडे यांनी हिंमत करून अक्कूविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. परंतु पोलीस गुन्हा दाखल करीत नव्हते. मात्र,अॅड. भांडे यांनी पत्रपरिषद घेतल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी अक्कूला अटक केली. दुस:या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले. परंतु त्याचा साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडला गेल्याने न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली़त्यानंतर पुन्हा त्याला 1क् ऑगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. याच दिवशी त्याचा खून करण्यासाठी जमाव आला होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती. मात्र, 13 ऑगस्ट 2क्क्4 रोजी पुरुष व महिलांच्या संतप्त जमावाने न्यायालय आवारातच अक्कूची निर्घृण हत्या केली़ या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.