मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. तर काही मतदारसंघात शेवटच्या टप्यात मतमोजणी चालू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्र सुद्धा स्पष्ट झाले आहेत. शहर आणि ग्रामीणमधील सर्वच्या सर्व 9 जागांवर युतीचे उमेदवार निवडणून आले आहेत. तर महाआघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नाही.
शहरातील मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी शेवटच्या टप्यात सुद्धा आपली आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. तर पूर्वमधून भाजपचे अतुल सावेंना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांची हॅटट्रिक साधली आहे. तर ग्रामीणमध्ये सुद्धा युतीचे सर्व उमेदवार विजय झाली आहेत.
गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पैठणमधून शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मतदारांनी पाचव्यांदा विधानसभेत पाठवले आहे. सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांचा 24 हजारपेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे. तर फुलंब्रीतून भाजपकडून रिंगणात असलेले हरिभाऊ बागडे यांनी आपला गड राखला आहे. त्याचप्रमाणे कन्नडमधून शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांचा विजय झाला असून, तिकडे वैजापूरमध्ये सुद्धा सेनेचे रमेश बोरणारे यांचा विजय झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 9 मतदारसंघात भाजपला संपूर्ण 3 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर उरेलेल्या 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही जागा निवडून आणता आले नाही. तर गेल्यावेळी औरंगाबाद मध्य मतदारसंघांची एमआयएच्या ताब्यात गेलेली जागावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
मिळालेल्या जागा
अतुल सावे (भाजप) औरंगाबाद पूर्व
प्रदीप जैस्वाल (शिवसेना) औरंगाबाद मध्य
संजय शिरसाठ ( शिवसेना) औरंगाबाद पश्चिम
प्रशांत बंब (भाजप) गंगापूर
हरिभाऊ बागडे (भाजप) फुलंब्री
अब्दुल सत्तार (शिवसेना) सिल्लोड
संदीपान भुमरे (शिवसेना) पैठण
उदयसिंग राजपूत (शिवसेना) कन्नड
रमेश बोरणारे (शिवसेना) वैजापूर