शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

शेळके खुनातील पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी

By admin | Published: October 31, 2016 1:35 AM

शेळके खूनप्रकरणातील पाच आरोपींची पोलीस कोठडीची रविवारी मुदत संपल्याने त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खूनप्रकरणातील पाच आरोपींची पोलीस कोठडीची रविवारी मुदत संपल्याने त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (वय ३५ रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ, जि. पुणे), संदीप सोपान पचपिंड ( वय ३० रा. आंबी, ता. मावळ, जि. पुणे), खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (वय ३० रा. माळवाडी, ता. मावळ, जि. पुणे),आकाश दीपक लोखंडे (वय २१, रा.जोशीवाडा, तळेगाव दाभाडे ) व दत्तात्रय ज्ञानेश्वर वाघोले ( वय २२ , ठाकरवाडी, इंदोरी ) अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपीची नावे आहेत. पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी (दि. १६ आॅक्टोबर) सकाळी येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. शेळके खून प्रकरणातील श्याम दाभाडेसह त्याचे सहा साथीदार फरारी आहेत. तर आठ जण पोलीस कोठडी भोगत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत. (वार्ताहर)