शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत!, कुलगुरूंच्या समितीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:44 AM

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या अंतिम सत्रातील परीक्षेसाठी आॅनलाइन, आॅफलाइन आणि संमिश्र असे सर्व पर्याय खुले ठेवण्याची शिफारस कुलगुरूंच्या समितीने राज्य सरकारकडे केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा पद्धती ठरविण्याचा निर्णय विद्यापीठ प्राधिकरणांवर सोपविण्यात आला आहे.अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने केलेल्या ११ शिफारशींचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निर्णयासाठी १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा आणि १ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा आयोजित करून विद्यापीठांनी निकाल लावावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या सेमिस्टरपुरते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिले जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.प्राधिकरणामधील व्यवस्थापन परिषद, परीक्षा मंडळे, विद्यापरिषद यांनी या संदर्भातील बैठकांमध्ये परीक्षा पद्धती, वेळापत्रक, कालावधी यांचे नियोजन करून सोमवारी ७ सप्टेंबर २०२० रोजी १२ वाजता अहवाल शासनीला सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत.महत्त्वाच्या शिफारशीविद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षांचे नियोजन करावे. विद्यार्थी घरातून परीक्षा देतील, यासाठी प्रयत्न करावेत.कमीत कमी कालावधीच्या परीक्षांचे आयोजन करता येईल. वस्तुनिष्ठ प्रश्न, ओएमआर पद्धती, ओपन बुक किंवा असाइनमेंट पद्धतींचा अवलंब करता येईल.दिव्यांगांना आवश्यक सुविधा विद्यापीठांनी उपलब्ध करून द्याव्या. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रकल्प अहवालांसाठी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करता येईल.विशेष बाब म्हणून, विद्यार्थी एखाद्या विषयाला बसू शकला नाही, तर त्याला पुन्हा संधी द्यावी.प्रात्यक्षिक परीक्षांसाठी स्काइप, मीटिंग अ‍ॅपचा वा टेलिफोनिक पद्धत वापरावी.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार