शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
“शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन
3
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
4
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
5
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
6
निम्रत कौरसोबत अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक गप्प का? बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाचा खुलासा
7
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
8
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
9
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
10
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
11
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
12
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
13
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
14
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
15
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
16
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
17
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
18
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
19
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
20
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित

सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश

By admin | Published: April 29, 2016 2:58 AM

राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश देण्यात आले असून यासंबंधीचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी २७ एप्रिल रोजी जारी केले

नागपूर : राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश देण्यात आले असून यासंबंधीचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी २७ एप्रिल रोजी जारी केले आहे, अशी माहिती राज्य शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासून त्यातील त्रुटी शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. यापूर्वी फिटनेस प्रमाणपत्र दिले असेल, अशा बसची देखील नव्याने तपासणी करण्यात यावी. येत्या शैक्षणिक सत्रापासून एकही अनफिट स्कूलबस रस्त्यावर धावू नयेत, अशा सूचना परिपत्रकात आहेत.वीरथ झाडे या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा ९ जानेवारी २०१२ रोजी घरासमोरच स्कूल बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र आहेत. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी उन्हाळ्याच्या सुटीनंतर होणार आहे. महाराष्ट्र मोटर वाहन (शाळा बसचे नियमन) नियम-२०११ मधील नियम २(ई)मध्ये स्कूल बसची व्याख्या देण्यात आली आहे. परंतु सध्या राज्यात स्कूल बसच्या नावाखाली धावत असेली असंख्य वाहने अनफिट आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. (प्रतिनिधी)शाळास्तरावर समिती स्थापनेचे निर्देश४ज्या शाळांमध्ये स्कूलबस आहेत, अशा सर्व शाळांमध्ये उन्हाळ्याची सुटी संपण्यापूर्वी ‘स्कूलबस समिती’ स्थापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, समिती स्थापन झाल्यानंतर बैठकाही नियमित झाल्या पाहिजेत, असे न्यायालयाने बजावले.