शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नक्षलग्रस्त भामरागडमध्ये सर्वच शाळा डिजिटल

By admin | Published: March 28, 2016 2:07 AM

छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तसेच नक्षली दहशतीचा वेळोवेळी कटू अनुभव येत असलेल्या भामरागड तालुक्यातील सर्वच १०७ शाळा डिजिटल बनल्या आहेत.

गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तसेच नक्षली दहशतीचा वेळोवेळी कटू अनुभव येत असलेल्या भामरागड तालुक्यातील सर्वच १०७ शाळा डिजिटल बनल्या आहेत. विद्यार्थी यानिमित्ताने शाळेत नियमितपणे येऊ लागल्याने पहिल्यांदाच गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हा तालुका दत्तक घेतला. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या तालुक्याला वेळोवेळी भेट देऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. तालुक्यात एकूण १०७ प्राथमिक शाळा आहेत व त्यामध्ये ४ हजार ८८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्याप मोबाइलही बघितलेला नाही. त्यातच आता मोबाइल, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर यांच्या मदतीने अध्यापन केले जात असल्याने हे साहित्य पाहण्याच्या उत्सुकतेपोटी विद्यार्थी स्वत:हून शाळेत येऊ लागले आहेत. डिजिटल साधनांबरोबरच सर्वच शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन सुरू झाले आहे.