शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

सगळं अजबच!

By admin | Published: May 14, 2017 4:38 AM

आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परफॉर्मिंग आटर््स अ‍ॅण्ड रिसर्च आणि संगीत कला केंद्र यांच्यातर्फे चित्रपट संगीतविषयक कार्यक्रम होतात ते

- रविप्रकाश कुलकर्णीआयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परफॉर्मिंग आटर््स अ‍ॅण्ड रिसर्च आणि संगीत कला केंद्र यांच्यातर्फे चित्रपट संगीतविषयक कार्यक्रम होतात ते नेहमीच वेधक असतात. त्यात कुशल गोपालका यांची टिकाटिप्पणी असते. त्यानेदेखील प्रेक्षकांच्या स्मृतिरंजनाला धुमारे फुटतात. म्हणून रसिक त्यांच्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात.कामिनी कौशलचा ९० वा वाढदिवस आणि अर्थात, त्यांच्यावर चित्रित केलेली गाणी असा कार्यक्रम कळल्यानंतर मोह आवरणं कठीणच होतं.आता कामिनी कौशल म्हटलं की, ‘नदियाके पार’, ‘आरजू’, ‘गीतान’, ‘बिरज बहू’ अशा चित्रपटांची नामावली डोळ्यापुढे तरळून जाते. तर एखादा पठ्ठा म्हणेल, एकेकाळी शहीदची ही नायिका मनोजकुमारच्या ‘शहीद’मध्ये भगतसिंगाची आई म्हणून दिसते...मला मात्र कामिनी कौशल म्हटलं की, ‘शबनम’मध्ये ‘ये दुनिया रूप की चोर, बचाले मुझे बाबू, बचाले मुझे बाबू, बचाले मुझे बाबू’ म्हणत ठुमकणारी ती आठवते. त्यातदेखील शमशाद बेगम यांनी ‘एक मराठा साहब आला’ हे गाणं काय ठसक्यात म्हटलं आहे. खरं सांगायचं तर आता हे सगळं मी यू ट्यूबवर पाहू शकतो.पण मोठ्या पडद्यावर अनेकांच्याबरोबर अशी गाणी पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. म्हणून कुशल गोपालकाचा एक सहकारी सुभाष भट याला म्हटलंदेखील की, ‘बाकी आणि काय दाखवायची ती दाखवा पण ‘शबनम’ वगळू नकोस रे बाबा...’पण त्याच वेळेला मनात आलं नव्वदीची कामिनी कौशल कशी दिसेल? जरा जर्जर असं कलावंताच रूप अस्वस्थ करून जातं. ते दोन्ही बाजूंनी असावं म्हणजे त्या कलावंताच्या लेखी आणि चाहत्यांच्या लेखीपण. दिलीप प्रभावळकर यांनी ‘हसतफसवीत’ कृष्णराव हेरंबकरांच्या कैफियतीत नेमकं मांडलं आहे. त्यात एक प्रसंग आहे, त्यांचे चाहते असलेले वाघमारे डायरी पुढे करून कृष्णरावांची स्वाक्षरी मागतात. पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकाच्या वेळी केलेल्या स्वाक्षरीच्या शेजारीच आताची स्वाक्षरी करा, असं सांगतात. त्यावर कृष्णराव म्हणतात, ‘‘आता सही नाही करत मी, हात कापतो माझा. काय आहे कलाकारांच्या वार्धक्याची खूण त्यांच्या संग्रही राहायला नको...’’हे सगळं अटळच. न टाळता येणारं...पण त्याचवेळी मनात आलं, ज्या कलावतीनं इतकी वर्षं अक्षय आनंद दिला तिला त्याची पोचपावती प्रत्यक्ष देऊन उभयपक्षी आनंद देण्याची संधी अनासायास आली आहे तर ती चुकवा कशाला?अशा संमिश्र भावनेनं गेलो खरा. खरं सांगायचं तर राहवलंदेखील नाही...अशा वेळी वातावरणात उत्कंठा भरलेली असतेच. ‘‘आल्या आल्या’’ कुणी तरी म्हटलं. सगळं सभागृह उठून उभं राहिलं. वाटलं वयोवृद्ध, थरथरणारी, लटलट मान हलणारी, कदाचित व्हीलचेअरवरून असेल असंही वाटलं...’’पण पाहतो तो काय, चक्क आपली पोनी टेल बांधत शिडशिडीत बांध्याच्या आजीबाई आत येत म्हणाल्या, ‘‘मी आलेच फ्रेश होऊन...’’या कामिनी कौशल यावर क्षणभर विश्वास बसेना. डोळेच विस्फारले...बाकी पुढचा तास सव्वा तास म्हणजे कुशल गोपालका गाणी दाखवत होता आणि ऐकवत होता. अर्थात, त्यांच्या जोडीला कामिनी कौशलची कॉमेन्ट्री. ती मूळची उमा कश्यप. पण प्रथमच नीचा नगरमध्ये चेतन आनंदने तिला घेतलं तेव्हा नाव बदललं. कारण चेतनच्या बायकोचं नाव उमाच होतं. मग कामिनी कौशल नाव घेतलं. कारण तिचा ‘के’ लकी ठरतो. म्हणून तिच्या मुलीचं नाव पण ‘क’ असलेलं आहे!मुलांसाठी तीन पुढे ‘पराग’मध्ये कथा लिहिल्या. त्यांच्यासाठीच बालचित्रपट केले. कठपुतळ्यांचे - पपेट शो केले. असं बरंच काही.आणि मुख्य म्हणजे सफळ संस्कार केला.याचं ढळढळीत प्रत्यंतर म्हणजे या कार्यक्रमात कामिनी कौशलचे मुलगे, मुली, त्यांची मुलं... थोडक्यात नातवंडं पतवंडं हजर होती. सगळ्यांच्या नजरेत आदरभाव होता आणि हीच कृतकृत्यता कामिनी कौशलच्या बोलण्यातून, देहबोलीतून व्यक्त होत होती!शेवटी कृतार्थता म्हणजे तरी वेगळं काय असतं? जाता जाता या प्रसंगाची खूणगाठ म्हणून स्वाक्षरीसाठी वही पुढे केली. बार्इंनी लफ्फेदार सही केली. ती पाहता कोण म्हणेल ही नव्वदीच्या व्यक्तीची सही म्हणून? सगळंच अजब!