मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक राहिल्याने शुक्रवारी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत झालेल्या ५१ हजार प्रवेश अर्जांत शुक्रवारी सुमारे ४० हजार अर्जांची भर पडली आहे.१५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आहे; तर १६ जूनला प्रवेश अर्जातील दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख आहे. शनिवार आणि रविवारी अधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. याआधी पहिल्या चार दिवसांत म्हणजे गुरुवारपर्यंत एकूण ५१ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले होते; तर शुक्रवारी दाखल झालेल्या अर्जांची संख्या ३९ हजार १७० इतकी आहे. त्यामुळे पहिल्या पाच दिवसांत एकूण ९१ हजार ५६ अर्ज दाखल झाले आहेत.दरम्यान, अॅप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र ३० हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी आत्तापर्यंत १ लाख ३१ हजार ६१० विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. परिणामी, अद्यापही दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
आॅनलाइन प्रवेशासाठी लगबग
By admin | Published: June 13, 2015 3:37 AM