शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

रुद्रबाबत सारेच अनभिज्ञ

By admin | Published: September 23, 2015 12:44 AM

ना आई-वडिलांना माहिती, ना गावाला कल्पना! तो कोठे आहे, काय करतो याबद्दल सारेच अनभिज्ञ. सहा-सात वर्षांपासून तो गावातच आलेला नाही. कॉ. गोविंद पानसरे.

जयवंत आदाटे, जत (सांगली) ना आई-वडिलांना माहिती, ना गावाला कल्पना! तो कोठे आहे, काय करतो याबद्दल सारेच अनभिज्ञ. सहा-सात वर्षांपासून तो गावातच आलेला नाही. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित रुद्रगोंडा पाटीलची ही कहाणी.रुद्रगोंडा रेवगोंडा पाटील. वय ३२. गाव जत तालुक्यातील काराजनगी. निगडी ते काराजनगीदरम्यान डोंगराळ भागात पाटील वस्ती आहे. तेथेच रुद्रचे साधे कौलारू घर आहे. सारे कुटुंब पूर्णपणे अशिक्षित आणि शेतकरी. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात रुद्रचे वडील रेवगोंडा पाटील (६७), आई रत्नाक्का (६०) यांना काहीही माहीत नाही. रुद्रगोंडाला चार चुलते, पण सगळे स्वतंत्र राहतात. वडिलांसह पाच जणांच्या नावावर १०२ एकर शेतजमीन आहे. परंतु दुष्काळी परिस्थिती व डोंगराळ भागामुळे त्यातून मिळणारे उत्पादन नाममात्रच. आई-वडील पशुपालन आणि शेती व्यवसाय करून गुजराण करतात. रुद्रगोंडा हा रेवगोंडा यांचा एकुलता एक मुलगा. त्याला जयश्री, सुवर्णा, राजाक्का या तीन बहिणी आहेत. त्यांची लग्ने झाली आहेत. रुद्रचे चुलते चनगोंडा पाटील काराजनगीचे पोलीसपाटील आहेत. रुद्रगोंडा, मडगाव बॉम्बस्फोटातील मृत चुलत भाऊ मलगोंडा पाटील व चुलते इरगोंडा पाटील हे तिघेही सनातनचे साधक. चुलते इरगोंडा यांच्यामुळेच रुद्रगोंडा आणि मलगोंडा ‘सनातन’कडे ओढले गेले. सेवानिवृत्त शिक्षक असलेले इरगोंडा पाटील ‘सनातन प्रभात’चे जत तालुका बातमीदार म्हणून काम करत आहेत, परंतु पानसरे हत्याप्रकरणी समीरला अटक केल्यानंतर तेही जत शहरातून फरार झाले आहेत.रुद्रगोंडाचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण काराजनगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण निगडी बुद्रुक हायस्कूल येथे व अकरावी आणि बारावीचे शिक्षण शिराळा येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो सांगलीला गेला. सांगलीत त्याने मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. सुरुवातीपासून तो सनातनचा साधक होता. २००८ मध्ये त्याने प्रीतीशी विवाह केला. विवाहानंतर एक वर्ष-दीड वर्ष ते दोघे काराजनगी येथे येत-जात होते. सध्या प्रीती सांगली शहरात वकिली करत असल्याचे त्याचे आई-वडील सांगतात. २००९ मधील मडगाव (गोवा) येथील बॉम्बस्फोटात मलगोंडा पाटीलचा मृत्यू झाला होता. त्यावेळी रुद्रगोंडा काराजनगी येथेच होता. स्थानिक आणि गोवा पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. त्यानंतर आठ-दहा महिन्यांनी तो काराजनगी येथून बेपत्ता झाला होता, तो अजून गायबच आहे. रुद्रगोंडाच्या आईला मराठी बोलता येत नाही व बोललेले समजतही नाही! त्यांच्यावर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. पाटील कुटुंबीय काराजनगीत राहत असले तरी, पोलीसपाटील वगळता घरातील इतरांना गावात कोणीही फारसे ओळखत नाहीत. वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर ग्रामस्थांना त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली.