शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

आपण सारे भाऊ... मिळून सगळे खाऊ!

By admin | Published: April 29, 2015 11:40 PM

कारण-राजकारण

‘डीसीसी बँकेसाठी इस्लामपूरच्या साहेबांनी पॅनेल करताच सोनसळच्या साहेबांनीही जमवाजमव केली. दोन्ही पॅनेलमधली नावं ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरून फिरायला लागली आणि जिल्ह्यातल्या तिसऱ्या-चौथ्या फळीची सटकली. त्यांचे मोबाईल वाजायला लागले. ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरून पोस्ट फिरायला लागल्या... सगळ्या दादा, अण्णा, काका, भाऊ, तात्या आणि साहेब मंडळींवर ही फळी खार खाऊन राहिलीय. गेल्या दोन दिवसांतला त्यांच्या हालचालींचा हा रिपोर्ट जसाच्या तसा...स्थळ : सांगलीतलं कमळाबाईचं कार्यालय. वेळ सायंकाळची. आरएसएसच्या शाखेचं काम संपल्यानंतर सगळे कार्यालयात आलेले. एक-दोघे तावातावानं सांगू लागले, संजयकाकांकडं खासदारकी आहे की, मग आता बँकेचं संचालकपद कशाला पाह्यजे? आम्ही इतकी वर्षं राबलोय... वगैरे वगैरे. त्यावर त्यातल्या चार-पाच जणांच्या कपाळावर आठ्या दिसायला लागल्या. ‘काका? आणि सांगली अर्बन बँकेत? आँ... कधी?’ असं त्यांनी विचारलंच. त्या पापभीरूंची मजल अर्बन बँकेपलीकडं जाणारी नव्हतीच! कमळाबाईच्या लोकांनी कधी ‘डीसीसी’ची निवडणूक राहू दे, बँकेची पायरीही चढलेली नव्हती, त्यामुळं अशी विचारणा होणारच.स्थळ : कमळाबाईचंच मुख्य कार्यालय, पण आत बसण्यापेक्षा सात-आठजण बाहेर अंधारात थांबलेले. त्यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. (कुणाची बिशाद आहे, काकांबद्दल जाहीर बोलायची!) ...आणि तिथं चर्चा कशाची होती, हे सांगायलाच हवं का? स्थळ : इस्लामपूर नगरपालिका, राजारामबापू कारखाना, दूध संघ यापैकी कोणताही गप्पांचा अड्डा... ‘वस्त्रोद्योग महासंघाचं अध्यक्षपद एकदा मिळालंय की. आता बँक कशाला? साहेबांना पण दुसरं कोण दिसत नाही वाटतं?’ असा सवाल जो-तो करू लागला. (अर्थातच आळीमिळी-गुपचिळी म्हणत.) त्यावर ‘बिनविरोध निवडून आणलंय, पण इकडच्या स्वारीला अध्यक्षपदाचे डोहाळे लागल्याचं दिसताच साहेबांनी शिराळ्यातल्या मानसिंगभाऊंनाही बिनविरोध संचालक केलं, बरं का! आम्हीच साहेबांना सांगितलं होतं, हा ‘कार्यक्रम’ करायला’ असं सांगण्याची मजलही काहींची गेली. मग एकमेकाला टाळ्या देणं सुरू झालं. या साऱ्या चर्चेत ‘सदाबहार’ दिलीपतात्यांचं नाव मात्र कोणीच घेत नव्हतं!स्थळ : कोणत्याही तालुक्यातला ‘फेमस’ ढाबा. स्टार्चच्या कपड्यातल्या नेत्याभोवती लिनन-जीन्समधले कार्यकर्ते ‘बसलेले’. रात्र चढायला लागलेली... तसे आवाजही चढू लागले. ‘आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या काय? सगळी मलईची पदं यांनाच...’ मग नावासकट उदाहरणं देणं सुरू झालं. (ही उदाहरणं त्या-त्या तालुक्यानुसार बरं का!) आटपाडीच्या ढाब्यावरचं बोलणं : राजेंद्रअण्णांना काय दिलं नाही? एकदा आमदारकी दिली. भावाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. कारखाना, बँक, सूतगिरणी आहेच. आता दुसऱ्या भावाला बँकेत घ्या म्हणं!तिकडं आष्टा-वाळव्यात... : शिंदे साहेबांना पक्षानं बँकेचं अध्यक्ष केलं, आमदारकी दिली, जिल्हाध्यक्ष केलं... आता परत बँकेत! मागच्या घोटाळ्यांचं कोण निस्तरणार? या वयात दगदग झेपंल का? तरण्या रक्ताला वाव द्यायला नको?कडेगाव किंवा पलूसमधला ढाबा : कदम साहेबांनी मोहनशेठ दादा आणि जावयाची पुन्हा सोय केलीय. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी, म्हणून पॅनेल केलंय, असं एकीकडं म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्याच घरात सगळं न्यायचं. दादा वीस वर्षं बँकेत आहेत आणि महेंद्रआप्पांना मागची टर्म दिली होती की! त्यातच जतच्या पाहुण्यालाही उभं केलंय. पार तिकडं जतपासून शिराळ्यापर्यंत हीच चर्चा. जतच्या जगताप साहेबांकडं आमदारकी आहे, पण पोराला बँकेत पाठवायचंय. विट्याचे अनिलभाऊ आमदार आहेत, पण त्यांनाही बँकेत यायचंय. मदनभाऊ कॅबिनेट मंत्री होते. आता महापालिका ताब्यात आहे, पण त्यांना बँकेच्या ‘एसी’ची झुळूक पाहिजे. विशालदादांकडं कारखाना आहे, पण बँकेचं संचालक झाल्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नाहीय. (आधी कारखान्याची बिलं द्या म्हणावं... असं कुणीतरी नतद्रष्ट परवाच्या बैठकीत हळूच म्हणाला म्हणे.) विधानसभेला नुरा कुस्ती करणारे हिंदकेसरींचे भीमराव जिल्हा परिषदेत सदस्य आहेत, तर इस्लामपूरच्या पवार कंपनीतल्या वैभवदादांकडं पवार बँकेचं अध्यक्षपद आहे. अंजनीतल्या सुरेशभाऊंच्या घरात वहिनींकडं नुकतीच आमदारकी आलीय, तर कडेगावच्या संग्रामभाऊंच्या खिशात कारखाना, दूध संघ, सूतगिरणी आहे. ढालगावच्या चंदूबापूंच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेत आहेत, तर मांजर्डेचे दिनकरदादा (तेच ते दीड दिवसाचे ‘डीसीसी’चे अध्यक्ष!) यांच्या सौभाग्यवती कमलताईही ‘झेडपी’त होत्याच की! डिग्रजचे जमादार सर आणि कोरेगावचे बी. के. सर तर ‘डीसीसी’त चेअरमन-व्हाईस चेअरमनच्या खुर्चीत बसले होते... पण आता परत या सगळ्यांना स्वत:साठी किंवा सग्यासोयऱ्यांसाठी बँकेचं संचालकपद पाहिजे!... कार्यकर्त्यांनो, बसा सतरंज्या उचलत!!जाता-जाता : संजयकाका, मदनभाऊ, जगतापसाहेब, अनिलभाऊ, मानसिंगभाऊ, दिलीपतात्या, जमादार सर, पृथ्वीराजबाबा, दिनकरदादा, राजेंद्रअण्णा अशी सारी मंडळी फार्म हाऊसवर बसलेली... समोर तांबडा-पांढरा आणि लालभडक सुक्कं होतं. तेवढ्यात शिंदेसाहेब आले. पाठोपाठ मोहनशेठ, विशालदादा आणि महेंद्रआप्पा. सगळे क्षणभर अचंबित... आणि मग हास्याचा कल्लोळ उसळला... ‘निकाल कायबी लागू दे, पण चाव्या आता आपल्याच हातात...’ असं कुणीतरी म्हणताच मोहनशेठ आणि शिंदेसाहेब बोलले, ‘मर्दांनो, पॅनेल करताना आम्ही डोकं चालवलं म्हणून बरं झालं... आपल्या दोन्ही साहेबांनी (इस्लामपूरकर आणि सोनसळकर) स्वत:साठी संचालकपद मागितलं असतं तर मग..?’- श्रीनिवास नागे