शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:38 AM

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला.

 जालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.इंग्लडस्थित भारतीयाचा मलबारहिल येथील बंगला खरेदी केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्यपाल विद्यासागर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचेजालना जिल्हा काँग्रेसचेअध्यक्ष जेथलिया यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तीन वर्षांत लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्राने कार्यकर्त्यांच्या नावावर जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली असल्याचा आरोप थेथलिया यांनी केला. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाºयांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगल्या अधिकाºयांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली.लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून याविरोधात आवाज उठविणाºयास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले.आरोप राजकीय द्वेषातूनमतदारसंघात होत असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांना त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशापोटी ते खोटे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मलबार हिल डी वॉर्ड,मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचाकाहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा हा प्रयत्नअसून याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे, असे लोणीकर म्हणाले.पालकमंत्र्यांचे गाव हागणदारीमुक्तीपासून दूरचकेवळ अट्टहास म्हणून जालना जिल्हा हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आला. वास्तविक पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे गाव अद्याप हागणदारीमुक्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात काय चित्र आसेल याची कल्पनाच केलेली बरी.स्वच्छ भारत अभियानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कुठलीही कामे दर्जेदार होत नसल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप जेथलिया यांनी केला.

टॅग्स :GovernmentसरकारCorruptionभ्रष्टाचार