कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा ‘सुपर बाजार’ सुरू असल्याचा घणाघाती आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. हे सरकार फसवे, भ्रष्ट असून, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.कर्जमाफी देणार नाही, असे ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘दिल्लीच्या आदेशा’ने कर्जमाफी द्यावी लागली, पण ती शेतकऱ्याना मिळूच नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच ८९पैकी केवळ फक्त १२ लाख शेतकऱ्यानी आॅनलाइन अर्ज केले आहेत. एकीकडे कर्जमाफीची अशी चेष्टा केली आणि दुसऱ्या बाजूला या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत, असे सांगून, अतिशय निर्लज्जपणे सरकारचा कारभार चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.एकीकडे फडणवीस शेतकऱ्याच्या सुकाणू समितीला ‘जिवाणू समिती’ म्हणतात, मीडियाची दुकानदारी म्हणतात, कर्जमाफीतून बँकांचे भले झाल्याचे सांगतात. त्यांनी ही कुचेष्टा थांबवावी, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि गुजराती प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना एक न्याय का? अशी विचारणाही चव्हाण यांनी केला.‘वरून’आदेश आल्याने प्रकाश मेहतांचे काम झालेमेहता हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एकमेव गुजराती मंत्री आहेत. गृहनिर्माण सचिवांनी अशा पद्धतीने विकसकाचा फायदा होणाºया तरतुदीचा वापर करून, या प्रस्तावाला मंंजुरी देऊ नये, असा स्पष्ट शेरा लिहिला असताना, याबाबतचा ‘वरून’आदेश आल्यानेच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. आता ‘वरून’म्हणजे मी वेगळे सांगायला नको, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
फडणवीस सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा ‘सुपर बाजार’, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 4:33 AM