शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

युती आघाडीतील उमेदवार आमने-सामने

By admin | Published: February 07, 2017 4:20 AM

इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा करावी लागली

आविष्कार देसाई , अलिबागइच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा करावी लागली. उमेदवारी मिळाल्याने युती आघाडीतील उमेदवार निवडणुकीसाठी आमने-सामने आहेत. यातून एकाला माघार घ्यावी लागणार आहे मात्र माघार घेतली नाही, तर युती आघाडीचा धर्म या निवडणुकीत न पाळल्याचे उघड होऊन त्याचा फायदा विरोधी उमेदवारांना होणार असल्याचे दिसून येते.अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ३९ तर, पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६६ असे एकूण १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने चेंढरे पंचायत समिती गणासाठी अ‍ॅड.जनार्दन पाटील यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली, परंतु आघाडातील घटक पक्ष असणाऱ्या शेकापनेही तेथे अधिकृत उमेदवार उभा करुन आव्हान उभे केले आहे. तीच परिस्थिती कुडूर्स पंचायत समिती गणात राष्ट्रवादीला अलविदा करुन शिवसेनेत गेलेले राजा केणी यांची झाली आहे. तेथेही त्यांच्या आघाडीतील काँग्रेसने आधीच उमेदवार उभा केला आहे. राजा केणी उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी शिवसेनेत दाखल झाले.अलिबाग तालुक्यातून प्रामुख्याने थळ जिल्हा परिषद मतदार संघात शेकापच्या चित्रा पाटील यांनी, तर शिवसेनेच्या मानसी दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चित्रा पाटील यांनी याआधीही कुडूर्स जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या मानसी दळवी यांना टक्कर देण्यासाठी त्यांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.जिल्ह्यामध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाली आहे. अलिबागमध्ये शेकापने राष्ट्रवादीला एकही जागा सोडलेली नाही. थळ मतदार संघ हा राष्ट्रवादीचा आहे, परंतु त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीने तेथे काही रस दाखविला नाही. युती असल्याने किमान पंचायत समितीच्या दोन जागा मिळाव्यात अशी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची इच्छा होती. चेंढरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे जनार्दन पाटील हे पत्नीसाठी, तर कुडूर्स पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा केणी इच्छुक होते. मात्र सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट संकेत त्यांना मिळत नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत होती, तशी त्यांची धाकधूक वाढत होती. उमेदवारी न मिळाल्याने अखेर राजा केणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत दाखल होण्याचे जाहीर केले. जनार्दन पाटील हे पक्ष सोडून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास तयार झाले होते. मात्र शेवटचा उपाय म्हणून त्यांनी पुन्हा सुनील तटकरे यांना साकडे घातले. राष्ट्रवादी अलिबाग तालुक्यात शाबूत ठेवायची असेल, तर कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार केलाच पाहिजे म्हणून तटकरे यांनी पाटील यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे बोलले जाते.सोमवारी पाटील यांनी पत्नी सुलभा पाटील यांचा अर्ज दाखल केला. त्याचबरोबर शेकापनेही स्वाती पाटील यांना अधिकृत उमेदवारी देत अर्ज दाखल केला. महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनीही चेंढरेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे युती आघाडीतील उमेदवार आमने-सामने आहेत. दुसरीकडे राजा केणी यांनाही शिवसेनेने कुडूर्स पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी देत त्यांचाही अर्ज दाखल केला. काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आघाडी आहे. विशेष म्हणजे याच कुडूर्स पंचायत समिती मतदार संघातून काँग्रेसने अनंत पाटील यांना अधिकृत उमेदवारी आधीच दिली आहे. त्यामुळे चेंढरे, कुडूर्स पंचायत समिती गणातून प्रत्येकी एका उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे. तसे न झाल्यास विरोधी उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.