शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

युती अधांतरीच ! युती नको भाजपात सूर

By admin | Published: January 13, 2017 5:13 AM

‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे

मुंबई/ठाणे : ‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे तितक्याच औत्सुकतेने विचारला जात आहे. गंमत अशी की, ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे, तीच मंडळी एकमेकांना हा प्रश्न विचारताना दिसत आहे! शिवसेना मुंबईच्या महापौरपदावर ठाम आहे. त्यामुळे राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांचा बिगुल वाजून ४८ तास उलटले तरी युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांकरिता शिवसेनेसोबत युती करण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये युतीच्या कुबड्या हव्या कशाला? अशी तीव्र भावना आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या प्रवेशद्वाराबाहेर लागलेल्या फलकांपासून व्यासपीठामागे लावलेल्या बॅनरपर्यंत आणि काही पदाधिकाऱ्यांच्या भाषणांतून स्वबळाचा नारा देण्याकरिता कार्यकर्ते किती आसुसलेले आहेत, याचेच प्रत्यंतर आले.प्रदीर्घ काळानंतर कार्यकारिणीची बैठक ठाण्यात झाली. प्रदेश कार्यकारिणीपूर्वी ठाण्याची जिल्हा कार्यकारिणी बैठक झाली. त्यातही स्वबळावर निवडणूक लढण्याचाच ठराव मंजूर केला गेला. या वेळी बोलताना शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मोकळेपणाने लढण्याची संधी दिली तर ताकद दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. लेले यांचाच सूर पक्षाचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत लावला. शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडलेल्या राजकीय ठरावात केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला गेला. याच ठरावावर बोलताना चव्हाण यांनी आता सरकारच्या या यशात आम्हाला कुणीही वाटेकरी नको आहे. व्यासपीठाच्या मागील बाजूला ‘सारा महाराष्ट्र जिंकू या’, असा बॅनर लावला होता. त्याच्याकडे बोट दाखवत चव्हाण म्हणाले की, आपल्याला सारा महाराष्ट्र जिंकायचा आहे, अर्धा नाही. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत तीन पायांची शर्यत संपवा, असे सांगत युती तोडण्याची भाषा केली होती.भाजपाच्या अनेक नेत्यांना युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, युती करताना पहिली चर्चा ही जागावाटपावर होते. त्यानंतर, काही विशिष्ट जागांवर होते.  विधानसभा निवडणुकीत भाजपाची वाढलेली ताकद पाहता आम्ही निम्म्या जागांच्या खाली जागा घेणार नाही आणि शिवसेना तेवढ्या जागा सोडायला तयार होण्याची शक्यता नाही.  शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने युतीचे जागावाटप तत्पूर्वी होणे कठीण आहे.  मात्र, भाजपाला युती नको, हा संदेश जाऊ नये, याकरिता आम्ही चर्चेची तयारी दाखवली आहे. अर्थात, ज्या जिल्हा परिषदांच्या क्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहेत, अशा ठिकाणी युती होईल, असे संकेत त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)बॅनर्सचा बोलबालाया बैठकीच्या ठिकाणी रस्त्यावर  ‘युती नको, विकास हवा’, ‘ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा’, ‘मोदी-फडणवीसांचा कारभार ठरला राज्यात नंबर वन, नको कुबडी युतीची, करा तयारी एकहाती विजयाची’... असा निर्धार व्यक्त करणारे बॅनर सकाळपासून लागले होते. बैठकीला येणारे नेते व पदाधिकारी क्षणभर थांबून हे बॅनर्स वाचत होते. हे बॅनर्स भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे नेते खासगीत मान्य करीत होते.