शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

टोलमुक्तीशी युती सरकार बांधील

By admin | Published: January 10, 2015 12:48 AM

चंद्रकांत पाटील : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी अनेक अडचणी, तरीही सोडवणारच

कोल्हापूर : स्व. गोपीनाथ मुंडे यांचे महाराष्ट्र टोलमुक्तीच्या स्वप्नाशी राज्यातील युतीचे सरकार बांधील आहे. वेळ लागेल; पण टोलबाबत योग्य निर्णय होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूरचा टोल ‘आयआरबी’ सहजासहजी सोडणार नाही. अडचणी अनेक आहेत; तरीही हा प्रश्न सोडवणारच, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. मंत्री पाटील म्हणाले, राज्यात पंधरा-पंधरा वर्षांचे जटील विषय आहेत. सरकार येऊन जेमतेम ६९ दिवस झाले. प्रश्न सोडविण्यासाठी थोडा वेळ लागणारच. टोलबाबत सरकारने काही निर्णय घेतला की कंपनी थेट न्यायालयात जाते. खारघरचा टोल बंदचा निर्णय घेतला. कंपनी न्यायालयात गेली; त्यामुळे तो पुन्हा सुरू झाला. मग न्यायालयाचा अवमान करायचा का? १२३ ठिकाणी टोलप्रश्न आहे. एक-एक करीत टोल घेऊन त्यांचा करार, मुदतीची माहिती घेऊन प्रश्न मार्गी लावू. सरकारपुढे केवळ टोलचा प्रश्न नाही. दुष्काळग्रस्तांसाठीचे पॅकेज, साखर कारखानदारांसह इतर प्रश्नही आहेत. अवजड वाहनांकडून जादा टोल घेऊन चारचाकींना वगळण्याचे धोरण केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सहा सी.एं. (चार्टर्ड अकौंटट)ची कमिटी नेमली असून, त्यांच्यामार्फत टोलच्या भौगोलिक कार्यक्षेत्राचा अभ्यास करून मुदत पूर्ण होत आलेले टोलनाके बंद करताना किती रक्कम संबंधित कंपनीला द्यावी लागणार, याचा अहवाल मागविला आहे. टोलबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांची बांधकाम विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या टोलचा पेच आहे. २२० कोटी प्रकल्पाच्या खर्चाला मान्यता आहे; पण ‘आयआरबी’ कंपनी ४०० कोटी खर्च केल्याचा दावा करीत आहे. वाढीव खर्चाची मान्यता यांसह विविध मुद्द्यांवर कंपनी भांडणार आहे. यातून मार्ग काढावा लागणार आहे. ‘अडत’बाबत गुरुवारी बैठकअडत्या जोखीम घेऊन शेतकऱ्यांना पैसे, तर व्यापाऱ्यांना माल देतो. त्यामुळे त्याला अडत दिली पाहिजे; पण ती कशी देता येईल, याबाबत वाशी बाजार समितीमधील अडत्यांशी चर्चा केली आहे. पुणे, नाशिक समित्यांमध्येही जाणार आहे. याबाबत गुरुवारी (दि. १५) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय होणार हे माहीत असल्याने लगेच २१ जानेवारीची बैठक बोलावली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. काँगे्रसचे सरकार पळपुटे !कॉँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या घोषणांची आम्ही पूर्तता करीत आहोत. राज्यावर ३ लाख ८४ हजार कोटींचे कर्ज करून कॉँग्रेस पळून गेली आहे; पण आम्ही पळ काढणारे नाही. यातून मार्ग काढून दिलेली आश्वासने पूर्ण करू, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.