अजित पवारांसोबतची युती पॉलिटिकल, फडणवीसांच्या विधानावर दादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:50 PM2023-07-15T12:50:03+5:302023-07-15T12:51:59+5:30

Ajit Pawar News: देवेंद्र फडणवीस यांनी परवा भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतची आपली युती ही इमोशनल युती आहे. तर अजित पवार यांच्यासोबत केलेली युती ही पॉलिटिकल युती आहे, असं विधान केलं होतं.

Alliance political with Ajit Pawar, Dada's one-sentence reaction to Fadnavis' statement, said... | अजित पवारांसोबतची युती पॉलिटिकल, फडणवीसांच्या विधानावर दादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

अजित पवारांसोबतची युती पॉलिटिकल, फडणवीसांच्या विधानावर दादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

googlenewsNext

या महिन्याच्या सुरुवातीला नाट्यमय घडामोडी घडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटाची एंट्री झाल्याने राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. अजित पवार गट युतीत सहभागी झाल्याने शिवसेना शिंदे गटामध्ये चलबिचल झाली आहे, त्याबरोबरच भाजपातील काही जणांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. पुढील निवडणुकीत जागावाटप कसं होईल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी परवा भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतची आपली युती ही इमोशनल युती आहे. तर अजित पवार यांच्यासोबत केलेली युती ही पॉलिटिकल युती आहे, असं विधान केलं होतं. आज प्रसारमाध्यमांनी याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर देत विषय संपवला.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसोबतची युती ही इमोशनल युती आहे, तर अजित पवारांसोबतची युती पॉलिटिकल युती आहे. पुढच्या पाच दहा वर्षांत तीसुद्धा इमोशनल होईल असं म्हटलं आहे, फडणवीस यांच्या या वाक्याकडे तुम्ही कसं बघता, असं अजित पवार यांना विचारलं असता अजित पवार यांनी मी या वाक्याकडे त्यांनी जसं सांगितलं तसं बघतो, अशी थोडक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला.

दरम्यान, नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. तसेच १८ तारखेला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला आपण प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

त्याबरोबरच शरद पवार याचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकला दिलेल्या भेटीबाबतही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अंतर्मनाची साद ऐकून मी सिल्व्हर ओकवर गेलो. राजकारण वेगळं मात्र परिवार वेगळा. काल काकींचं ऑपरेशन होतं. त्यांच्या हाताला दुखापत झाली होती, काल दिवसभर माझं काम सुरू होतं. यानंतर मी सुप्रिया सुळे यांना फोन केला. तर त्यांनी मला सिल्व्हर ओकवरच यायला सांगितलं. मला काकींना भेटायचं होतं, म्हणून मी तिथे ओकवर गेलो. यावेळी शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळेही तिथे उपस्थित होत्या. मात्र तिथे कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही अजित पवार म्हणाले. 

Web Title: Alliance political with Ajit Pawar, Dada's one-sentence reaction to Fadnavis' statement, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.