शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

आॅरिकमध्ये भूखंड वाटप २८ नोव्हेंबरपासून

By admin | Published: November 10, 2016 5:28 AM

आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २८ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यातील १०० एकरमध्ये उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची

औरंगाबाद : आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २८ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यातील १०० एकरमध्ये उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. यातील २० एकर जागा लघुउद्योगांसाठी आरक्षित असेल. तर, १० एकरमध्ये इको-सिस्टम डेव्हलपमेंट करण्यासाठी गाळे बांधण्यात येतील. एकमेकांसाठी पूरक असे उद्योगक्षेत्र विकसित होण्यासाठी आॅरिक सिटीचा मोठा वाटा असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेंद्रा येथील ‘आॅरिक हॉल’ या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, एकात्मिक औद्योगिक शहर म्हणून आॅरिक विकसित होईल. दोन टप्प्यांत हे काम होईल. पहिला टप्पा ९ स्क्वे.मीटरचा आहे. आॅक्टोबर २०१८पर्यंत शेंद्रा नोडचे काम पूर्ण होईल. बिडकीनमधील काम २०१७ मध्ये सुरू होईल. २०२० मध्ये पहिला टप्पा, २०२१ मध्ये दुसरा टप्पा, २०२२ मध्ये तिसरा टप्पा असे काम होईल.भूमिपूजनप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा.चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, आॅरिकचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांच्यासह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आॅरिकमध्ये ७० हजार कोटींची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने येईल. ३० लाखांपर्यंत रोजगार निर्मिती होईल. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेट बैठक होत असून, डीएमआयसीसाठी ८ हजार कोटींच्या निधीबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. ३ हजार कोटींचा निर्णय मागेच झालेला आहे. ६०० कोटींचा निधी आॅरिकसाठी मिळालेला आहे. कॅबिनेटमध्ये महत्त्वाची घोषणा होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)