कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुणे-मुंबईतील कैद्यांनी पंधरा दिवसांपूर्वी ओली पार्टी केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले. हा प्रकार अतिशय गंभीर असून, कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांच्यासह तुरुंगाधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच तीन सुरक्षा रक्षकांना निलंबित केल्याची माहिती पुणे कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बुधवारी दिली.स्वाती साठे यांनी सर्वप्रथम कारागृह परिसराची पाहणी केली. ‘व्हिडीओ क्लिप’मध्ये दिसणाऱ्या ‘त्या’ कैद्यांना समोर बोलावून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ‘पार्टी’ केल्याची कबुली दिली. त्यानुसार या पाचही कैद्यांवर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांची पुणे व तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांची सांगली कारागृहाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षारक्षक विजय टिपुगडे, मनोज जाधव, युवराज कांबळे या तिघांना निलंबित केले. तुरुंग अधिकारी एस. एम. सोनवणे व एस. एस. हिरेकर हे दोघेही या प्रकरणात दोषी आढळून आले असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविला असल्याचेही साठे यांनी सांगितले. दारु, गांजा नव्हे, शिराकैद्यांनी केलेल्या पार्टीमध्ये गांजा, दारू किंवा मटण मिळून आले नाही. त्यांनी ते तुपात शिरा शिजवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कैद्यांनीच रचला कट ‘व्हिडीओ क्लिप’मध्ये दिसणारे कैदी बाळू चौधरी, किसन सोमा राठोड, अजिम अबू सलिमखान, गणेश देविदास शिंदे, बबलू जमीर यांच्याकडे कसून चौकशी केली. कारागृहात काही अधिकारी व सुरक्षारक्षक कैद्यांना विनाकारण त्रास देत होते. कैद्यांना त्यांच्या मनासारखी वागणूक मिळावी, या उद्देशाने अधिकारी व सुरक्षारक्षकांना अद्दल घडविण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे संपूर्ण दृश्य मोबाईलद्वारे क्लिक केले.शरद शेळके नवे अधीक्षक अधीक्षक सुधीर किंगरे यांच्या जागी तत्काळ पुणे येथील शरद शेळके यांची नियुक्ती केली. शेळके यांनी मंगळवारीच पदभार स्वीकारला.
अधीक्षकांसह कळंबा तुरुंग अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
By admin | Published: November 26, 2015 3:23 AM