शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आधीच खड्डे, त्यात दरवाढीचे विघ्न

By admin | Published: August 12, 2016 4:17 AM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार आहे. महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्यामुळे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार आहे. महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्यामुळे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी वेळेवर पोहोचता यावे यासाठी परिवहन विभागाने पर्यायी मार्ग सुचविले आहेत. मात्र हे मार्ग फार लांबचे ठरत असल्याने एसटीलाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कोकणात जाणाऱ्या मार्गांवर तात्पुरती भाडेवाढ केली जाणार आहे. गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या मार्गाची २५ आॅगस्टपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा विचार बैठकीत करण्यात आला. तसे झाल्यास वाहतूककोंडीची समस्या सुटेल व प्रवाशांना वेळेत गावी पोहोचता येईल, असा बैठकीत विचार मांडण्यात आला. त्यानुसार रावते यांनी एसटी प्रशासनाला तशा सूचना दिल्या. या सूचनांनुसार मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बस खोपोली, पाली मार्गे माणगाव, महाड, चिपळूणपर्यंत जातील. तर चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या एसटी बसना पुणे, सातारा, उंब्रज (कुंभार्ली घाट) मार्गे जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र या पर्यायांमुळे एसटी बसनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मार्गांवर गणेशोत्सव काळात भाडेवाढ करण्याचा विचार केला जात आहे. मुंबई ते चिपळूण प्रवासात पर्यायी मार्गाचा वापर केल्यास २५ किलोमीटरचा अधिक प्रवास होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये जादा मोजावे लागतील. तर मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत पर्यायी मार्गाने प्रवास झाल्यास ११0 किलोमीटर जादा प्रवास होत असून तिकिटामागे ११0 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. स्थितीचा आढावा २५ आॅगस्टपर्यंत घेतला जाईल आणि पर्यायी मार्गांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. ही भाडेवाढ ही १ ते ५ सप्टेंबरपर्यंत लागू राहील. (प्रतिनिधी)गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीकडून १,७५0 ग्रुप बुकिंग सोडण्यात आल्या आहेत. त्याच्या २000 पेक्षा जास्त फेऱ्या होणार असून १ ते ५ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील. १0 आॅगस्टपर्यंत १,९५२ फेऱ्यांच्या ग्रुप बुकिंगचे आगाऊ आरक्षण झाले आहे. पर्यायी मार्गावरून या बस धावल्या तर ग्रुप बुकिंगमधील प्रत्येक प्रवाशाकडून जदा भाडे घेतले जाणार आहे.त्याचप्रमाणे ३ ते ४ सप्टेंबर रोजीही नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्त एसटीकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बसही पर्यायी मार्गावरून गेल्यावर प्रवाशांना अधिक भाडे द्यावे लागेल. ज्यादा बस सोडण्याची व्यवस्था मुंबई सेंट्रल, परेल, कुर्ला नेहरूनगर, ठाणे (खोपट) आणि बोरीवली बस स्थानकातून करण्यात आली आहे. 1महामार्ग क्रमांक ६६ हा जुना एनएच-१७ म्हणून ओळखला जातो. हा मार्ग मुंबई-पनवेल-पेण- माणगाव-महाड आणि पुढे जातो. मात्र या मार्गाचा वापर न करण्यावरच विचार केला जात आहे. 2गणेशोत्सवात कोकणात जाताना सध्याचा महामार्ग क्रमांक ६६ चा वापर केल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंतचा प्रवास हा १८ ते २0 तासांपर्यंतचा होऊ शकतो. त्यामुळे हा प्रवास टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केला जात आहे.एसटी बसना टोलमधून सूट द्या : गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने जाणाऱ्या एसटी बसना राष्ट्रीय व राज्य मार्गावरील टोलमधून सूट मिळावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.