विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या बेमुदत संपावर तोडगा काढण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच पुण्या-मुंबईसह शहरी भागांत फळे व भाजीपाला पोहोचविण्यासाठी पणन विभागाने पुढाकार घेतला आहे. विशेष कक्षातून फळे-भाजीपाल्याची विक्री करण्यात येणार आहे.पणन विभागामार्फत पुणे, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी मार्केट याशिवाय जिल्हा तसेच तालुकास्तरांवर संनियंत्रण कक्ष स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. या सर्व कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे आवश्यकतेनुसार पोलीस व संबंधित परिवहन अधिकारी यांची मदत घेतील, असेही देशमुख यांनी सांगितले.पुण्यातील पणन मंडळाच्या मुख्य कार्यालयात नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. संप काळात कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास ०२०-२४२६११९०/ २४२६८२९७/ २४२६३४८६ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३०२४४ येथे संपर्क करावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
‘पणन’ची पर्यायी व्यवस्था
By admin | Published: June 03, 2017 3:38 AM