नारायणगाव - उसाच्या मळीपासून तयार होणाºया इथेनॉलपासून डिझेल व पेट्रोल हे पर्याय ठरवू शकतात. १९३१ मध्ये याचा शोध लागूनही ७० वर्षांनंतर इथेनॉलचा १० टक्के वापर डिझेल व पेट्रोलवर केला जात आहे़ अटलबिहारी वाजपेयी यांच्या निर्णयापासून इथेनॉलचा वापर सुरू झाला. जोपर्यंत इंग्रजांच्या काळातील बर्मासेल जाणार नाही़, तोपर्यंत डिझेल व पेट्रोल तयार करण्याची परवानगी मिळणार नाही, अशी टीका का कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली़ दरम्यान, नरेंद्र मोदी व देवेेंद्र फडणवीस सरकार शेती मालाच्या धोरणावर गंभीर दखल घेत आहेत़ २ वर्षानंतर शेतक-यांचे जीवनमान बदलल्याशिवाय राहणार नाही, अशी पुष्टीही पटेल यांनी यावेळी दिली.नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृ षी विज्ञान केंद्रातर्फे वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल फार्मस् या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पाशा पटेल यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी अतुल बेनके, प्रदीप पाटील, के़एऩषास्त्री, अनिल देषमुख, संगिता माने, तात्यासाहेब गुंजाळ, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, रविंद्र पारगांवकर, नंदाताई डांगे, डॉ़ श्रीकांत विध्वांस, डॉ़ संदीप डोळे, शशिकांत वाजगे, रत्नदिप भरविरकर, सोमजीभाई पटेल, सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे, महेश बोराना, मकरंद पाटे, अनिल घनवट आदी उपस्थित होते़पाशा पटेल म्हणाले, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था इथेनॉलवर आहे़ आपल्या देशातही इथेनॉलचा वापर झाल्यास डिझेल व पेट्रोलला पर्याय मिळू शकतो व शेतक-यांना चांगले बाजारभाव मिळू शकतात़ शासनाने निश्चित केल्याप्रमाणे शेतक-यांची शासकीय मजूरी २०० रू़ प्रति रोज आहे़ उच्च शिक्षीत अधिका-याचा पगार प्रति दिन २७०० रू़ आहे. कृषी प्रधान देशात स्केलवाल्या शेतक-याला २०० रू़ तर अनस्केल उच्चशिक्षीताला २७०० रू अशी तफावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़आपण पदभार स्विकारल्या पासून नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला आयाताबाबतची सर्व आकडेवारी दिल्यानंतर आयातीवर बरेच निर्बंध आणल्याचेही त्यांनी सांगितले. ४० वर्षांत प्रथमच तुरीची आयात २ लाख क्विटंल पेक्षा जास्त झालेली नाही़ भारतात तुरीचे उत्पादन वाढलेले आहे़ २ कोटी ३५ लाख क्विटंल तुरीचे उत्पादन झाले आहे़ पुर्वी पेक्षा ४० लाख क्विटंल उत्पादन वाढले आहे़ शासनाने २७ लाख क्विटंल तुर खरेदी केलेली आहे़ वाढलेल्या तुरी व इतर धान्यांविशयी निर्णय घेण्यासाठी हाय कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे़ केंद्र सरकारने १९ नोव्हेंबर रोजी आदेश काढून शेतक-यांना निर्यात करण्यास परवानगी दिली आहे़ यावेळी पटेल यांनी द्राक्ष, केळी, कांदा याबाबत मार्गदशन करून फडवणीस सरकार षेतक-यांच्या हिताचे निर्णाय घेत आहे त्याचा परिणाम २ वर्षांनी वर्षांनी दिसेल अशी ग्वाही दिली.प्रास्ताविकात अनिलतात्या मेहेर यांनी केले. या कृशी प्रदर्षनाच्या उद्घाटन सोहळयात शेतकरी राजेंद्र तोडकर, पल्लवी हांडे, रामदास बो-हाडे, पत्रकार किरण वाजगे, सुरेश वाणी, पार्वती ढेगळे, जयश्री हाडवळे/पाडेकर, बाळासाहेब पवार, अजित बागल, कांतीलाल वीर, राहुल घोगरे या मान्यवरांचा कृशी विज्ञान केंद्रातर्फे पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला़ सुत्रसंचालन मेहबुब काझी, सुनिल ढवळे यांनी केले.प्रदिप पाटील म्हणाले, तीन तालुक्यात ७ धरणे असल्याने या भागाचे नंदनवन झाले आहे. शेतकोयांना शेती शिवाय पर्यान नाही. बारामती नंतर नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र हे शेतक-यांना चांगले मार्गदर्शन करीत आहेत़ शेती समृध्द होत असताना शेतकरी देखील समृध्द झाला पाहीजे़ शेतक-यांच्या शेतीमालाला आधारभुत किंमत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.अतुल बेनके म्हणाले की, शेती मध्ये उन्नती झाली तरच शेतक-यांमध्ये उन्नती होईल. जुन्नर व आंबेगाव तालुक्याला शेती शिवाय पर्याय नाही़ निसर्ग आणि सरकारचे धोरण यावर शेती अवलंबून आहे़ शेतक-यांच्या प्रगतीसाठी शासनाने गांभीर्याने पाहीले पाहीजे़ शेतक-यांच्या विरोधात धोरण असेल तर सरकार पाडण्याची ताकद शेतक-यांमध्ये आहे़लाखनसींग म्हणाले की, शेतक-यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृशी विज्ञान केंद्र मार्गदर्शन करीत आहे़ नविन तंत्रज्ञान अवगत करण्याची क्षमता येथील षेतक-यांमध्ये आहे़ शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र संशोधन करीत आहे़ या केंद्राच्या मार्फत शेतक-यांसाठी आधुनिक लॅब तयार करण्याचा मानस कृशी भूषण अनिलतात्या मेहेर यांच्या मनात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले़
इथेनॉल पेट्रोलीयम पदार्थांना पर्याय - पाशा पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:13 AM