कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्यातर्फे २३ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया होणार आहे़ त्यामुळे या कालावधीत श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही़ या काळात भाविकांसाठी उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत श्री पूजक आणि देवस्थान समितीची सोमवारी बैठक झाली़ या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी यांनी ही माहिती दिली. या कालावधीत उत्सवमूर्तीचे दर्शन पितळी उंबऱ्यापासून घेता येईल़ ६ आॅगस्टला सायंकाळी देवीचे दर्शन पूर्वीप्रमाणे घेता येईल, असे सैनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अंबाबाईचे दर्शन १५ दिवस बंद
By admin | Published: July 14, 2015 1:09 AM