कोल्हापूर : महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने २६ किलो सोन्याने बनविलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या सुवर्ण पालखीचा शुद्धीकरण सोहळा शनिवारी उत्साहात झाला. वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व ट्रस्टचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले.करवीरनिवासिनी अंबाबाईची सोन्याची पालखी करण्याचा संकल्प ‘महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट’ने केला होता. यात एक ग्रॅम ते एक किलो सोने भाविकांनी दान केले. त्यातून कारागीर गणेश चव्हाण, महेश चव्हाण, योगेश चव्हाण, अभिजित चव्हाण यांनी अथक परिश्रमातून पालखी बनविली. (प्रतिनिधी)गंगाजलासह विविध नद्यांचे पाणीसुवर्ण पालखीच्या शुद्धीकरण सोहळ्यासाठी गंगाजलासह देशभरातील विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. मंगलधाम येथे शुद्धीकरण सोहळ्याचा एक भाग म्हणून १६ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. पालखी लवकरच विविध मान्यवर व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे समर्पित करण्यात येणार आहे.
अंबाबाईच्या सुवर्ण पालखीचा शुद्धीकरण सोहळा
By admin | Published: March 19, 2017 12:42 AM