कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे शुक्रवार (दि. २२) पासून पेटाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्र्यांसह अख्खे राज्य मंत्रिमंडळ शुक्रवारी येथे येणार आहे. रेसिडेन्सी क्लबमध्ये शुक्रवारी दुपारी प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यावेळी अधिवेशनात मांडावयाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी हे पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत. शनिवारी (दि. २३) सकाळी दहा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे कोल्हापुरात स्वागत केले जाणार आहे. साडेदहा वाजता बिंदू चौकातून प्रदेश प्रतिनिधी फेटे बांधून महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर पेटाळा येथे मिरवणुकीने जाणार आहेत. साडेअकरा वाजता पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी तीन वाजता दुसरे सत्र होणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकारांशी चर्चा करणार आहेत. रात्री आठ वाजता पक्षाध्यक्ष अमित शहा राज्य कॅबिनेटची आढावा बैठक घेणार आहेत. रविवारी (दि. २४) सकाळी साडेनऊला सांगता समारंभ होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणाार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार असल्याचे भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई यांनी सांगितले.(प्रतिनिधी)असे असेल अधिवेशनाचे नियोजनशुक्रवारस्थळ : रेसिडेन्सी क्लब दुपारी ४.३० वाजता प्रवक्ते माधव भंडारी यांची पत्रकार परिषदसायंकाळी ५.३० वाजता अधिवेशन नियोजनासाठी कार्यकारिणीची बैठक.शनिवारसकाळी दहा वाजता बिंदू चौकात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह प्रतिनिधी एकत्र१०.३० वाजता फेटे बांधून महालक्ष्मीचे दर्शन११.०० वा. मिरवणुकीने अधिवेशनास्थळी आगमन११.३० वाजता अधिवेशनाचे उद्घाटनदु. ३ वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद ३.३० वाजता दुसरे सत्र८.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक $$्निुरविवार सकाळी ९.३० वाजता अधिवेशनाची सांगतादुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा
अमित शहा शुक्रवारी कोल्हापुरात
By admin | Published: May 20, 2015 12:56 AM