Amit Shah at Lalbaugcha Raja Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजाचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अमित शाह मुंबई विमानतळावर पोहोचले. यानंतर ते वांद्रे येथे गेले. गृहमंत्री शाहा यांनी वांद्रे येथे जाऊन भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाला भेट दिली. तेथील बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर ते वरळी सी लिंक मार्गे लालबागकडे रवाना झाले. गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
गृहमंत्री अमित शाह दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. यावर्षीही ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. लालबागचा राजाच्या दर्शनाला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्याच पद्धतीने शाह यांनीही दरवर्षीप्रमाणे हजेरी लावली. अनेक दिग्गज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. बॉलीवूड कलाकार, मराठी कलाकार आणि अनेक बडे राजकारणी लालबाग पाहण्यासाठी येतात. गृहमंत्री शाह यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गृहमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.
भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेतेही या वेळी शाह यांच्यासोबत उपस्थित होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अमित शाह यांची शिंदे-फडणवीसांशी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत राज्यातील पावसाळी स्थितीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांची अनुपस्थिती का?
अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी शाह मुंबई आले असून त्या कार्यक्रम पत्रिकेवर अजित पवारांचेही नाव आहे. पण अजित पवार बारामतीच्या नियोजित दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळेच ते शाह यांच्या मुंबई दौऱ्यात दिसले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजित पवारांची उपस्थिती काही वेगळे संकेत तर देत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.