शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:28 IST

महायुतीतील तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

BJP Amit Shah: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरात दाखल झाले आहेत. शाह यांच्या उपस्थितीत पश्चिम विभागीय बैठक होणार असून इतरही काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील महायुती सरकारमध्ये निर्माण झालेल्या काही तिढ्यांबाबत अमित शाह यांच्याकडून मध्यस्थी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेला संघर्ष निवळावा, यासाठी अमित शाह हे महायुतीतील घटकपक्षांना पर्याय सुचवतील, असं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्‍यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या घटनेला महिनाभराचा कालवधी उलटून गेल्यानंतरही अद्याप या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांच्याविरोधात भरत गोगावले यांनी तर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या दादा भुसे यांनी मोर्चेबांधणी केली आहे. या तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव या राज्याचे व्हीआयपीदेखील पुणे हजर राहणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वानवडी वाहतूक विभाग आणि बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले. वानवडी वाहतूक विभागांतर्गत पाण्याची टाकी सर्कल ते टर्फ क्लब रोडदरम्यान दुतर्फा वाहतूक शनिवारी सुरू राहणार आहे.

बाणेर रोडवरील वाहतूक अशाप्रकारे वळवली जाणार १) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.२) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.३) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाPuneपुणेMahayutiमहायुती