ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 27 - वेरूळ - औरंगाबाद महोत्सव यंदा १४ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. महानायक अमिताभ बच्चन यांची मधुशाला, अदनान सामी आणि कनिका कपूर यांचे सुफी व गझल गायन, उद्धव आपेगावकर आणि बेल्जियमचे बर्ड कॉ. निर्लिस यांच्यातील मृदंग - सीतारची जुगलबंदी हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.मराठवाड्यातील दुष्काळ व इतर कारणांमुळे गेल्या तीन वर्षांपासून वेरुळ-औरंगाबाद महोत्सव झाला नव्हता. यंदा १४, १५ आणि १६ आॅक्टोबर रोजी हा महोत्सव घेतला जाणार आहे. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत कलावंतांची नावे निश्चित करण्यात आली. महोत्सवासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च येणार असून, हा निधी कसा उपलब्ध करायचा, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.पहिला दिवस वेरूळला महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची प्रमुख उपस्थिती असेल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे कार्यक्रम वेरूळ लेणी परिसरात होतील. पार्वती दत्ता आणि सहकाऱ्यांचे शास्त्रीय नृत्य तसेच पुणे येथील गायिका सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन या दिवशी होणार आहे. उद्धव आपेगावकर आणि बेल्जियमचे कलावंत बर्ड लॉ निर्लिस यांच्यातील मृदंग आणि सितारची जुगलबंदी तसेच अभिनेत्री ग्रेसीसिंग हिच्या नृत्याचा आविष्कार हे पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. सोनेरी महलमध्ये बिग बीवेरूळ महोत्सवातील १५ आणि १६ आॅक्टोबरचे कार्यक्रम सोनेरी महालात होतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ आॅक्टोबर रोजी कोजगरी पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या रात्री प्रसिद्ध संगीतकार, गायक अजय - अतुल हे आपली कला सादर करतील. १६ आॅक्टोबर रोजी ह्यबिग बीह्ण अमिताभ बच्चन हे ह्यमधुशालाह्ण या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचे वाचन करणार आहेत. गायक अदनान सामी आणि कनिका कपूर यांच्या गझल व सूफी गायनाचा कार्यक्रमही याच व्यासपीठावर रंगणार आहे. स्थानिकांनाही संधीवेरूळ महोत्सवात स्थानिक कलावंतांनाही संधी मिळणार असून, त्यासाठी कलाग्राम येथे स्वतंत्र व्यासपीठ उभारले जाणार असल्याचे दांगट यांनी स्पष्ट केले.
अमिताभची मधुशाला, अदनान सामीच्या गायनाची पर्वणी
By admin | Published: July 27, 2016 11:16 PM