अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 05:02 PM2021-02-20T17:02:43+5:302021-02-20T17:05:04+5:30
काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेतली आहे.
मुंबई : काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेतली आहे. ''काँग्रेस पक्ष या अभिनेत्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करेल, तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या कलाकारांना संरक्षण देईल'', असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. (ramdas athawale slams nana patole over amitabh bachchan and akshay kumar statement)
नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानाचा रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल, अशा इशारा रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना दिला.
सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका
लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे
नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. हिंदी मराठी चित्रपटसृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.
झुंडला लोकशाही पद्धतीने विरोध
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंड चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. जिथे जिथे चित्रपट प्रदर्शित होईल, तेथे काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवण्यात येईल. कुठलेही सिनेमागृह बंद पडणार नाही. मात्र, बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याचे भूमिका आमची राहणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.