मुंबई : प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन हे महाराष्ट्रातील फळभाज्यांचे बँड्र अॅम्बॅसेडर म्हणून भूमिका बजावणार आहेत. फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेतल्यानंतरची ही ‘फल’निष्पत्ती आहे.
अमिताभ हे गुजरातमधील पर्यटनाचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत. मुंबईचे रहिवासी असूनही ते महाराष्ट्रासाठी कुठलेही ब्रँडिंग करत नाहीत, अशी टीका होत आली आहे. मात्र आता त्यांनीच टि¦ट करून महाराष्ट्रातील फलोत्पादनांचे प्रमोशन करणार असल्याचे म्हटले आहे. त्यात आंबे, चिकू, डाळिंब, कांदे, टोमॅटो, द्राक्षेही असतील, असे ते म्हणाले. आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले की, मी मंगळवारी अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ब्रँड अॅम्बॅसेडर होण्याचे मान्य केले. मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उपयोग फलोत्पादनाच्या ब्रँडिंगसाठी कसा करून घ्यायचा याबाबतची निश्चित योजना आम्ही आखू आणि लवकरच त्याबाबत घोषणा करू.
सचिन तेंडुलकर, अभिनेते आमिर खान यांना व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बॅसेडर करण्याचा प्रय} सामाजिक न्याय विभागाने मध्यंतरी केला होता; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. (विशेष प्रतिनिधी)