शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

जन्मदात्यांच्या शोधार्थ अमितची भटकंती

By admin | Published: January 02, 2017 11:04 PM

‘तू आमचा खरा मुलगा नसून, वंशाला दिवा असावा म्हणून आम्ही तुला विकत घेतले आहे’

ऑनलाइन लोकमत/ बाळासाहेब काकडे

अहमदनगर, दि. 2 - ‘तू आमचा खरा मुलगा नसून, वंशाला दिवा असावा म्हणून आम्ही तुला विकत घेतले आहे’, हे आईच्या तोंडचे बोल ऐकून अमित पांडुरंग नरुटे या तरुणाला धक्काच बसला आणि त्याने सुरू केला शोध खऱ्या आई-वडिलांचा़ त्याचा हा शोध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बारामतीतून सुरू झालेला खऱ्या आई-वडिलांचा शोध त्याला श्रीगोंदा शहरापर्यंत घेऊन आला़ मात्र, त्याला अद्याप त्याचे खरे आई-वडील कोण याचा सुगावा लागला नाही.अमित पांडुरंग नरूटे हा काझड (ता़ इंदापूर) येथील रहिवासी़ असून, तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे़ बारामती येथील भारत फोर्ज कंपनीत तो अभियंता म्हणून काम करीत आहे़ अलका व पांडुरंग नरुटे (रा़ काझड) या दाम्पत्याने अमितला लहानाचे मोठे केले़ आपलीच ओळख त्याला दिली़ एव्हढेच नव्हे, तर अलका नरुटे यांचाच तो मुलगा असल्याची नोंदही बारामती येथील रमाबाई मोकाशी हॉस्पिटलमध्ये आहे़ मात्र, याच अलका नरुटे यांनी एके दिवशी अमितला ‘तू आमचा मुलगा नाहीस, तुला आम्ही वंशाला दिवा हवा म्हणून विकत घेतले आहे, असे सुनावले़ त्यामुळे अमितला मोठा धक्का बसला़ मग त्याने सुरू केला शोध खऱ्या आई-वडिलांचा.२९ मे १९९१ साली बारामती येथील रमाबाई मोकाशी हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या अमितने खरे आई-वडील शोधण्यासाठी याच हॉस्पिटलकडून माहिती अधिकारात माहिती मागविली़ या माहितीनुसार २९ मे रोजी अलका नरुटे यांची प्रसूती होऊन त्यांना मुलगा झाल्याची नोंद आहे़ मात्र, त्याचदरम्यान या हॉस्पिटलमध्ये रंजना निगडे (रा़ बामजेवाडी), सुरेखा चव्हाण (रा़ पवारवाडी), मीरा संजय खोमणे (रा़ श्रीगोंदा), उषा शंकर निगूल, नलिनी सुभाष सावंत, आशा अंकुश खोमणे (रा़ फलटण रोड), मंदा जगताप (रा़ मुंबई), शारदा प्रभाकर गुजले (रा़ खांडज), सविता धनंजय खलाटे (रा़ शिरसणे), रेहना सल्लाउद्दिन इनामदार (रा़ कारखेल, ता़ बारामती) या मातांनीही बाळांना जन्म दिल्याची नोंद आहे़ त्यामुळे अमित या मातांना शोधत फिरत आहे़ कंपनीतील नोकरी करून सुटीच्या काळात तो खऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहे. अमित हा शाळेत अतिशय हुशार होता़ तो नरुटे परिवारात लहानाचा मोठा झाला. पण लहानपणापासून त्याला परिवारात दुय्यम वागणूक मिळत होती़ एकदा आईने त्याला सांगितले की, ‘तू आमचा नसून, तुला आम्ही विकत घेतले आहे़’ याचा अमितवर मोठा परिणाम झाला़ त्यानंतर त्याने खऱ्या आई-वडिलांचा शोध सुरू केला़ मात्र, अद्याप त्याला खऱ्या आई-वडिलांचा शोध लागला नाही़ त्याचा शोध सुरूच असून, अमितला खरे आई-वडील मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे. मी खऱ्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी दोन वर्षांपासून फिरत आहे़ ज्या दिवशी खरे आई-वडील सापडतील, तो दिवस माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा असेल़ माझी कुणावरही अन्याय करण्याची भावना नाही़ परंतु मला खऱ्या आई-वडिलांचे प्रेम मिळावे, अशी मनोमन इच्छा आहे़ त्यासाठी मी डीएनए चाचणी करून घेण्यास तयार आहे़-अमित नरुटे, काझड (ता. इंदापूर, जि. पुणे)