शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

जेव्हा निकालापूर्वीच अमोल कोल्हे होतात खासदार..?  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:32 PM

शिरूर लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव - पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार श्री. संभाजीमहाराज फेम डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच रंगली.

शेलपिंपळगाव : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीपूर्वीच कार्यकर्त्यांनी शिरूरचा खासदार ठरवण्याची किमया लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागणार की काय,  अशी चर्चा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.शिरूर लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव - पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार श्री. संभाजीमहाराज फेम डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच रंगली. डॉ. कोल्हे हे माळी समाजाचे आहेत, खोटी दाढी - मिशा लावतात, ते माणसांचे डॉक्टर आहेत की जनावरांचे, मराठी टायगर्समधील चित्रीकरण, छत्रपती उदयनराजेमहाराज यांच्या विरुद्ध लढण्यास विचारण्यात आल्याने शिवसेना सोडली, यासह अनेक आरोपांमुळे या लढतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. परिणामी, शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

येत्या २३ मे रोजी लोकसभेची मतमोजणी आहे. त्यानंतर निकाल कुणाच्या बाजूने कौल देणार, हे कागदोपत्री स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे चक्क एका लग्नपत्रिकेवर प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचा (खासदार, शिरूर लोकसभा) म्हणून उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

 

टॅग्स :KhedखेडPuneपुणेShirurशिरुरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक