मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा आज गेवराईत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरायची भीती वाटते. त्यामुळे का नाही आम्ही म्हणायचं 'नुसतीच सांगायला दिल्लीत छप्पन इंचाची छाती आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरताना जनतेची वाटते भीती' अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गेवराईत असताना कोल्हे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाना साधला. भाजपची महाजनादेश यात्रा धुळ्यात असताना, मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या पत्नीला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरायाची भीती वाटत आहे. 'निसतच सांगायला दिल्लीत छप्पन इंचची छाती आणि महाराष्ट्राच्या मुख्यामंत्र्यांना रस्तावर फिरताना जनतेची वाटते भीती' असे आम्ही म्हणालो तर चुकीच काय ? अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
पुढे बोलताना त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सुद्धा आपला निशाना साधला, ज्यांची डिग्रीच बोगस आहे, अशा माणसाने आम्हाला शिकवू नयेत. सत्तेत असून सुद्धा तुम्ही पूरग्रस्तांसाठी भिक मागत फिरतात, लाज कशी वाटत नाही असे करतांना. अशा शब्दात त्यांनी तावडे यांचा समाचार घेतला.