शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 6:08 PM

अजित पवारांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या इव्हेंट कंपनी डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला व तो पोस्ट केला होता. यावरून मिटकरी भडकले होते.

शरद पवारांचे वर्चस्व संपवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी अचानक गुलाबी रंग स्वीकारला होता, तेव्हा एका इव्हेंट कंपनीची चर्चा सुरु झाली होती. त्यावरूनच आता राष्ट्रवादीत अमोल मिटकरी आणि पार्थ पवार यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अजित पवारांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या इव्हेंट कंपनी डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला व तो पोस्ट केला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अरोरा यांच्यावर टीका सुरु केली होती. इव्हेंट कंपनीमुळेच अजित पवारांना यश मिळाले असा मेसेज जनतेत जातो, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून मिटकरींनी देखील अरोरा यांच्यावर टीका केली होती. 

विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालं हे कोणत्या पीआर कंपनीमुळे मिळाले नाही असे म्हणत हे केवळ अजित पवारांचे यश आहे, असे मिटकरींनी ट्विट केले होते. यावरून आज पार्थ पवारांनी मिटकरींना सुनावले आहे. राष्ट्रवादी पक्षानेही हे मिटकरींचे वैयक्तीक मत आहे, असे म्हटले होते. 

मिटकरी काय म्हणालेले... हे सगळे खोटे आहे. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी, ती काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचे श्रेय आपल्याकडे घेतले, अशी टीका मिटकरींनी केली होती. मी जबाबदारीने बोलतोय, आमच्या भावना दुखल्या त्याचं काय? पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग 41 आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपत होते का? असा सवाल मिटकरींनी केला होता. 

यावर आता पार्थ पवार यांनी अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेचे सदस्य असूनही डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबाबत पक्षविरोधी भुमिका घेतली आहे ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. माझे वडील अजित पवार आणि पक्ष मिटकरी यांच्या वक्तव्याशी मुळीच सहमत नाही. त्यांनी अशी वक्तव्ये करण्यापासून दूर रहावे असे आवाहन करतो, असे पार्थ पवारांनी म्हटले आहे. 

टॅग्स :parth pawarपार्थ पवारAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४