शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

"...तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता", अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:26 PM

Amol Mitkari : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाला मंजूरी दिल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यासंदर्भात विचारणा केली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांच्यासाठी आमची दारे नेहमी खुली आहेत. ज्या पक्षात त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही. ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधे सन्मानाचे स्थान मिळाले नाही. मी तर पंकजाताईंना विनंती करतो, की जिथं आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, अमोल मिटकरी यांनी आज सकाळी ट्विटद्वारे मनसे आणि राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. मनसेकडून शरद पवारांची बृजभूषण सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अमोल मिटकरी यांनी खोचक ट्विट करत राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केला होता. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही! हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे)”, असे ट्विटसोबत लिहिले होते.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?मध्यप्रदेश सरकारने ज्या प्रकारे ओबीसी आरक्षण टिकवून दाखविले, त्याप्रमाणे राज्य सरकारनेही पावले उचलावी. काही मदत लागल्यास मी स्वत: मध्यप्रदेशात जायला तयार आहे. मी लागेल ती मदत करेन, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केले आहे. तसेच, ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्यासाठी ओबीसी नेते कमी पडत आहेत. ओबीसी आरक्षण टिकवून ठेवणारे लोक कमी पडत आहेत. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण आमच्या हातातून गेलं, हा फार मोठा गुन्हा आहे. मी बोलले होते की ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीPankaja Mundeपंकजा मुंडेOBC Reservationओबीसी आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा