धारणी (जि. अमरावती) : राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी आलो आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसांत रक्कम जमा केली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.‘माझा एक दिवस, माझ्या बळीराजासाठी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावात येऊन आदिवासी शेतकरी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी बुधवारी रात्री मुक्काम केला. गुरुवारी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसांत रक्कम’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 4:27 AM