ऑनलाइन लोकमत
तिवसा / अंजनगाव सुर्जी (अमरावती), दि. 7 - शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. तिवसा तालुक्यात शेतकºयांच्या कर्जमाफ ीसाठी मुंडण केले तर अंजनगाव सुर्जी येथे भाजपाचे आमदार रमेश बुंदिले यांच्या घराला घेराव घालण्यात आला.
राज्यात असलेल्या भाजपा सरकारने शेतकºयांना कर्जमाफी, दुष्काळी मदतही दिली नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील जवळपास १० हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकºयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे फसवेगिरीचे आहे असे आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करुन शासनाचा निषेध नोंदविला. तिवसा तहसील कार्यालय च्या फाटका समोर मुंडण करत उपस्थित युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजीपाला व दुध फेकून सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध केला.
दर्यापूर अंजनगाव सुर्जी मतदार संघाचे आमदार रमेश बुंदिले यांच्या अंजनगांव येथील घराला शेतकºयांनी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान घेराव घालून घोषणा दिल्या. आमदार बुंदिले घरी नसल्याने त्यांचे स्विय सहायकांनी आंदोलक शेतकºयांची समजूत काढली. मात्र आंदोलकांनी आक्रमकपणा सोडला नाही. यामुळे काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.